तामिळनाडूतील मंदिरात शिक्क्यासाठी चेंगराचेंगरी; 7 ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 08:25 AM2019-04-22T08:25:21+5:302019-04-22T08:25:57+5:30

चैत्र पौर्णिमेनिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

stampede in Tamil Nadu temple; 7 killed | तामिळनाडूतील मंदिरात शिक्क्यासाठी चेंगराचेंगरी; 7 ठार

तामिळनाडूतील मंदिरात शिक्क्यासाठी चेंगराचेंगरी; 7 ठार

Next

तिरुचिरापल्ली : तामिळनाडूमधील तुरायूरमध्ये एका मंदिरात रविवारी आयोजित एका कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी झाल्याने सात भाविकांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. मुथियमपलयम गावातील रूप्पास्वामी मंदिरात मंदिराचा शिक्क्याचे वितरण करण्यात येत होते.


चैत्र पौर्णिमेनिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जेव्हा पुजाऱ्यांनी मंदिराच्या शिक्क्यांचे वितरण सुरु केले तेव्हे तो मिळविण्य़ासाठी भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यावेळा चार महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला. तर अन्य 10 जण जखमी झाले आहेत. 


मंदिराच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की पूजा सुरु असताना गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. तसेच गर्दीच्या प्रमाणात तेवढे पोलिसही मंदिरात उपस्थित नव्हते. 


रूप्पास्वामी मंदिरातील शिक्का मिळाल्यास त्यामुळे घरामध्ये संपन्नता येते अशी तेथील लोकांची भावना आहे. यामुळे गावातीलच नाहीत तर आजुबाजुच्या जिल्ह्यांमधीलही हजारो लोक हे शिक्के मिळविण्यासाठी येतात. हा शिक्का मिळाल्यास तो घरातील तिजोरीमध्ये ठेवला जातो. 
 

Web Title: stampede in Tamil Nadu temple; 7 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.