स्टँड अप इंडियात १६,७१२ कोटींचे दिले कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 06:06 AM2020-03-04T06:06:10+5:302020-03-04T06:06:12+5:30
महिला दिनाच्या (आठ मार्च) आधी अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, स्टँड अप इंडिया योजनेत सरकारने महिलांसाठी १६,७१२ कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे.
संतोष ठाकूर
नवी दिल्ली : महिला दिनाच्या (आठ मार्च) आधी अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, स्टँड अप इंडिया योजनेत सरकारने
महिलांसाठी १६,७१२ कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे. अर्थ मंत्रालयाने या योजनेत ८१ टक्के लाभार्थी महिला असल्याचे सांगितले.
महिलांमध्ये उद्यमशीलतेचा विकास व्हावा, असा सरकारने प्रयत्न केला. स्टँड अपच नाही तर अर्थ मंत्रालयाच्या इतर योजनांतदेखील गेल्या सहा वर्षांत महिलांना विशेष प्रोत्साहन दिले गेले आहे. मुद्रा योजनेत ७० टक्के, प्रधानमंत्री जनधन
योजनेत एकूण ३८.१३ कोटींपैकी २०.३३ कोटी लाभार्थी महिला आहेत. याचसोबत एपीवायमध्ये ४३ टक्के, पीएमजेजेबीवाय व पीएमएसबीवायच्या एकूण लाभार्थींपैकी ४० टक्के महिला आहेत.