नगरपालिकेची अनधिकृत बांधकाम तोडण्याची मोहीम सुरू
By Admin | Published: December 12, 2015 12:18 AM2015-12-12T00:18:52+5:302015-12-12T00:21:52+5:30
इगतपुरी : शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्र मणे वाढली असून, नगरपालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत अतिक्र मणे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. नगरपालिका हद्दीतील तळेगाव येथील राष्ट्रीय महामार्गालगत गट नं. ३०५ (ब) अवतारसिंह हरनामसिंह शेी यांच्या मालकीच्या जागेवर बांधकाम करण्यात आले. मात्र यासाठी नगरपालिकेची व राष्ट्रीय महामार्ग विभागाची परवानगी न घेता बांधकाम करण्यात आले होते.

दरम्यान, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विशाखा मोटघरे यांच्या नेतृत्वाखाली हे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहायाने पाडण्यात आले. यावेळी बांधकाम अभियंता यशवंत ताठे, जे. आर. शहा, हिरामण कोरडे, पाणीपुरवठा इंजिनिअर धीरज भांमरे, रफीक शेख, नागेश जाधव, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. अनधिकृत बांधकाम तोडल्याने बांधकाम मालकाचे सुमारे दहा लाखांहून अधिक नुकसान झाले आहे, असे बोलले जात आहे. (वार्ताहर)