कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारीसाठी ‘शी-बॉक्स’ वेब पोर्टल सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 08:52 AM2017-07-25T08:52:16+5:302017-07-25T12:01:57+5:30
महिलांच्या तक्रारीसाठी महिला व बालविकास मंत्रालयाने सोमवारी ‘शी-बॉक्स’ नावाचं पोर्टल सुरू केलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25- नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ झाला तर त्याची तक्रार आता महिलांना करता येणार आहे. महिलांच्या तक्रारीसाठी महिला व बालविकास मंत्रालयाने सोमवारी ‘शी-बॉक्स’ नावाचं वेब पोर्टल सुरू केलं आहे. त्या पोर्टलवर आता केंद्र सरकारच्या नोकरीत असलेल्या महिलांना जर नोकरीच्या ठिकाणी लैंगिक छळाला सामोरं जावं लागलं तर थेट तक्रार करता येइल. नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होण्याचं प्रमाण किती आहे, याची देशव्यापी पाहणी करणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी म्हणाल्या आहेत. "शी-बॉक्स" हे पोर्टल सुरू केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मनेका गांधी बोलत होत्या.या पोर्टलची सुरुवात सध्या केंद्रीय कर्मचारी महिलांसाठी सुरु झाली असली तरी लवकरच याचा विस्तार करण्यात येईल आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी देखील ही सेवा सुरु केली जाईल, असं मनेका गांधी म्हणाल्या.
आणखी वाचा
मराठी खासदारांनी गाजविली संसद
पासपोर्टसाठी जन्माच्या दाखल्याची गरज नाही
कपड्यांवरून व्यक्तीचा ‘क्लास’ ठरतोय!
शी-बॉक्स हे पोर्टल जितकं परस्परसंवादी करता येईल तितकं करावं अशा सूचनाही मनेका त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ऑनलाईन व्यवस्थेत काही बदल करण्याची गरज आहे. ते केल्यानंतर खासगी नोकऱ्यांतील महिलाही तक्रारी या पोर्टलवर दाखल करू शकतील, असं मनेका गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. नोकरीच्या ठिकाणी महिलांशी होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून देण्याची घोषणा गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात करण्यात आली होती. विविध मंत्रालयातील महिलांनीच लैंगिक छळाच्या तक्रारी महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांच्याकडे केल्या होत्या.
नोकरीच्या ठिकाणी लैगिक त्रासाला सामोर जावं लागत असलं तरीही अनेक महिला कर्मचारी सहकारी कर्माचाऱ्याची किंवा वरीष्ठ अधिकाऱ्याची तक्रार करताना बिचकतात. पण शी-बॉक्सच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या तक्रारी द्यायला माध्यम मिळतं आहे, असंही मनेका गांधी यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २०१४ पासून कामाच्या ठिकाणी विनयभंग व इतर गुन्ह्य़ांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. २०१५ च्या आकडेवारीनुसार ११९ गुन्हे यात समोर आले होते तर त्यापैकी ७१ लोकांवर आरोपपत्रं ठेवण्यात आलं तर एकूण पाच जणांना शिक्षा झाली आहे.