वास्कोत तियात्र स्पर्धेस प्रारंभ

By Admin | Published: January 20, 2016 01:51 AM2016-01-20T01:51:36+5:302016-01-20T01:51:36+5:30

वास्को : गोवा तियात्र अकादमीने येथील बायणा रवींद्र भवनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या सातव्या पॉप्युलर तियात्र स्पर्धेचे उद्घाटन नामवंत तियात्रिस्ट मार्सेलिन दबेती यांच्याहस्ते करण्यात आल़े

Start of Vascoit Tiyatra Tournament | वास्कोत तियात्र स्पर्धेस प्रारंभ

वास्कोत तियात्र स्पर्धेस प्रारंभ

googlenewsNext
स्को : गोवा तियात्र अकादमीने येथील बायणा रवींद्र भवनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या सातव्या पॉप्युलर तियात्र स्पर्धेचे उद्घाटन नामवंत तियात्रिस्ट मार्सेलिन दबेती यांच्याहस्ते करण्यात आल़े
यावेळी रवींद्र भवनचे अध्यक्ष शेखर खडपकर, गोवा तियात्र अकादमीचे अध्यक्ष आगुस्तीन तेमोदो, आयोजक समितीचे अध्यक्ष प्रेमानंद लोटलीकर, रवींद्र भवनचे सदस्य प्रसाद प्रभुगावकर, श्याम च्यारी, गिल्डो गुदिन्हो आदी मान्यवर उपस्थित होत़े उद्घाटन कार्यक्रमानंतर ‘बिल्डर 2’ या तियात्राच्या प्रयोगाने स्पर्धेला सुरुवात झाली़ 1 फे ब्रुवारीपर्यंत चालणार्‍या या स्पर्धेत 24, 25, 26 जानेवारी वगळता दि़ 19 रोजी ‘रेवेंर बांदलेले घोर’, दि़ 20 रोजी ‘बिल्डर 2’, दि़ 21 रोजी ‘भोगोस म्हाका’, दि़ 22 रोजी ‘हवालदार’, दि़ 23 रोजी ‘टुरिझम मिनिस्टर’, दि़ 27 रोजी ‘स्टाईक’, दि़ 28 रोजी ‘हातरुण पोळेन पाय सोड’, दि़ 29 रोजी ‘मुóो’, दि़ 31 रोजी ‘मोजेचो खेळ’, दि़ 1 रोजी ‘सोत खोईं आसा’, दि़ 2 रोजी ‘सोकोरिना’़ आदी प्रयोग सादर होणार आह़े दि. 4 फे ब्रुवारी रोजी बक्षीस वितरण होणार आह़े
यावेळी शेखर खडपकर म्हणाले, तियात्र ही गोव्याची जुनी परंपरा आह़े ती जपून ठेवली पाहिज़े त्यासाठी यंदा मे महिन्यात रवींद्र भवनात लहान मुलांसाठी तियात्र प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितल़े
(वार्ताहर)

फ ोटो आहे : 1901 वीएएस 01
ओळी : तियात्र स्पर्धेचे उद्घाटन करताना मार्सेलीन दबेती़ बाजूला शेखर खडपकर व इतर मान्यवऱ
छाया : शेखर कळंगुटकर

Web Title: Start of Vascoit Tiyatra Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.