‘स्टार्टअप इंडिया’मुळे व्यवस्थेस चालना - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 05:40 IST2025-01-17T05:36:15+5:302025-01-17T05:40:06+5:30
मोदी यांनी म्हटले की, मागील ९ वर्षांत या परिवर्तनकारी योजनेने असंख्य तरुणांना सशक्त बनवले आणि त्यांच्या अभिनव विचारांना स्टार्टअपमध्ये रूपांतरित केले.

‘स्टार्टअप इंडिया’मुळे व्यवस्थेस चालना - नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : ‘स्टार्टअप इंडिया’ ही एक परिवर्तनकारी योजना असून, तिच्यामुळे भारतास जागतिक पातळीवरील सर्वांत मोठी तसेच जिवंत स्टार्टअप व्यवस्था निर्माण करण्यास प्रेरित केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.
‘स्टार्टअप इंडिया’च्या ९ व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यम मंच ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये हे वक्तव्य केले. मोदी यांनी म्हटले की, ‘स्टार्टअप इंडिया’ ही आपली सर्वाधिक हृदयस्थ योजना आहे. कारण ती युवकांच्या सबलीकरणाचे एक सशक्त माध्यम म्हणून पुढे आली आहे.
मोदी यांनी म्हटले की, मागील ९ वर्षांत या परिवर्तनकारी योजनेने असंख्य तरुणांना सशक्त बनवले आणि त्यांच्या अभिनव विचारांना स्टार्टअपमध्ये रूपांतरित केले.