स्टेट बँकेची १४३८ कोटींची अशदेव कंपनीकडून फसवणूक, सहयोगी बँकांनाही मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 04:04 AM2022-07-10T04:04:28+5:302022-07-10T04:18:22+5:30

सीबीआयने दाखल केला गुन्हा .

State Bank fraud of Rs 1438 crore by metal company Ashdev Company other banks fraud too | स्टेट बँकेची १४३८ कोटींची अशदेव कंपनीकडून फसवणूक, सहयोगी बँकांनाही मोठा फटका

स्टेट बँकेची १४३८ कोटींची अशदेव कंपनीकडून फसवणूक, सहयोगी बँकांनाही मोठा फटका

Next

मुंबई : धातू आणि खनिज क्षेत्रात कार्यरत असलेल्या अशदेव कंपनीने स्टेट बँक व तिच्या नेतृत्वाखालील चार बँकांची १४३८ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त कर्जाची रक्कम अवैधरित्या फिरवणे, बंद पडलेल्या कंपन्यांना मालाची विक्री केल्याचे दाखवणे आणि कंपनीच्या ताळेबंदात बनावट नोंदी केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप-सरव्यवस्थापक सनातन मिश्रा यांनी सीबीआयकडे लेखी पत्राद्वारे ९ डिसेंबर २०२० रोजी तक्रार दाखल केली होती. या पत्राच्या आधारे सीबीआयने आता गुन्हा दाखल केला आहे. यानुसार, अशदेव कंपनीचे संचालक सुमन गुप्ता आणि प्रतीक गुप्ता यांनी स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांकडून कर्ज घेतले होते. परंतु, १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीमध्ये कंपनीच्या ताळेबंदात आणि आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता दिसून आली. 

तसेच, प्राप्त कर्जापैकी २१६ कोटी रुपयांची रक्कम कंपनीने दुसऱ्या कंपन्यांकडे वळविली होती. मूळ कर्जाच्या हेतूच्या विपरित असे हे हस्तांतरण होते. तसेच, कंपनीने परदेशातील तीन बंद पडलेल्या कंपन्यांकडेही कोट्यवधींची विक्री केल्याचे दाखवले होते. या प्रकरणी कर्जाची परतफेड खुंटल्याने बँकांनी कंपनीच्या साऱ्या व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट केले होते. याद्वारे कंपनीकडून बँकांची तब्बल १४३८ कोटी ४५ लाख रुपयांची (ही रक्कम केवळ मुद्दलाची आहे, त्यामुळे हा आकडा वाढू शकतो असा दावा बँकांनी केला आहे.) फसवणूक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी अन्य बँकांच्या सहमतीने या प्रकरणी सीबीआयकडे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

ताळेबंदात गोंधळ 
अशदेव कंपनीने स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांकडून कर्ज घेतले होते. परंतु, १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीमध्ये कंपनीच्या ताळेबंदात आणि आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता दिसून आली. 

Web Title: State Bank fraud of Rs 1438 crore by metal company Ashdev Company other banks fraud too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.