"राज्य देशविरोधी कारवायांचे केंद्र बनतेय; सत्ता मिळाल्यास देवस्वोम बोर्डस भाविकांच्या हाती देऊ"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 05:07 AM2021-03-23T05:07:40+5:302021-03-23T05:58:14+5:30

देवस्वोम बोर्डस हे माकपच्या कारवायांची केंद्रे बनली आहेत. हे बोर्डस भाजप सत्तेत आल्यास ते निश्चितच रद्द केले जातील आणि त्यांचा ताबा भाविकांकडे दिला जाईल.

"The state is becoming the center of anti-national activities; if we get power, we will give Devaswom boards to the devotees" | "राज्य देशविरोधी कारवायांचे केंद्र बनतेय; सत्ता मिळाल्यास देवस्वोम बोर्डस भाविकांच्या हाती देऊ"

"राज्य देशविरोधी कारवायांचे केंद्र बनतेय; सत्ता मिळाल्यास देवस्वोम बोर्डस भाविकांच्या हाती देऊ"

Next

थिरूवनंतपूरम : केरळ राज्य देशविरोधी कारवायांचे केंद्र बनत चालले आहे, अशी  टीका केंद्रीय रसायने व खते मंत्री सदानंद गौडा यांनी केली. ६ एप्रिलला केरळमध्ये विधानसभा निवडणूक आहे. पत्रकारांशी येथे सोमवारी बोलताना गौडा म्हणाले, राज्यात भाजप सत्तेत आला तर उत्तर प्रदेशमध्ये बनविण्यात आलेला ‘लव्ह जिहाद’सारखा कायदा बनविला जाईल. 

केरळमध्ये देवस्थानांचे व्यवस्थापन देवस्वोम बोर्डसकडे आहे. भाजपला सत्ता मिळाल्यास ते भाविकांकडे सोपविले जाईल, असेही गौडा म्हणाले. केरळ देशविरोधी कारवायांचे मोठे केंद्र बनले असल्याचे सांगून मंत्री के. टी. जलिल यांची सोन्याच्या तस्करीप्रकरणी चौकशी झाली आहे. ते मंत्री असताना असे होणे लाजीरवाणे असल्याचे गौडा म्हणाले. पक्षाचे माजी प्रमुख कोडीयेरी यांच्या मुलाला अटक झालेली आहे. केरळमध्ये काही विकास नाही, असा आरोप सदानंद गौडा यांनी केला. 

देवस्वोम बोर्डस हे माकपच्या कारवायांची केंद्रे

  • गौडा म्हणाले की, देवस्वोम बोर्डस हे माकपच्या कारवायांची केंद्रे बनली आहेत. हे बोर्डस भाजप सत्तेत आल्यास ते निश्चितच रद्द केले जातील आणि त्यांचा ताबा भाविकांकडे दिला जाईल. ‘लव्ह जिहाद’ने संपूर्ण समाजाला इजा केली आहे. 
  • लव्ह जिहादचे प्रमाण वाढले असून त्याचा फटका ज्या कुटुंबांना बसला त्यांना वेदना होत आहेत. परंतु, जेव्हा केरळ सरकारसारखे सरकार त्याला प्रोत्साहन देते तेव्हा लोकांना मोठे महत्त्व मिळते.” 
  • या प्रश्नामुळे ख्रिश्चन समाजाचे मोठे नुकसान झाल्याचे गौडा म्हणाले. आम्ही जर सत्तेत आलो तर केरळमध्ये त्याविरोधात कायदा करू, असेही ते म्हणाले.

Web Title: "The state is becoming the center of anti-national activities; if we get power, we will give Devaswom boards to the devotees"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा