राज्य/ महत्वाचे

By admin | Published: March 14, 2015 11:45 PM2015-03-14T23:45:32+5:302015-03-14T23:45:32+5:30

युवकाची आत्महत्या

State / Important | राज्य/ महत्वाचे

राज्य/ महत्वाचे

Next
वकाची आत्महत्या
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील दानोळी गावातील काळम्मा वसाहतीमध्ये दारूच्या नशेत युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. तानाजी शामराव पोवार (वय २५) असे त्याचे नाव असून, या घटनेची नोंद येथील पोलिसांत झाली आहे.
पाणीपुरवठ्यात दहा लाखांचा गोलमाल
सांगली : जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍याने गरज नसताना स्टार्टर, प्रिव्हंेटर, आदी दहा लाखांच्या साहित्याची खरेदी करून गोलमाल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकार्‍यास त्वरित निलंबित करून, या खरेदीची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
शेजार्‍यांमध्ये हाणामारी;
१७ जणांवर गुन्हा
सातारा : पळशी (ता. खटाव) येथे बांधकाम व कोर्टाच्या कारणांतून शेजार्‍यांच्यातच मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी बाळकृष्ण पवार, श्रीपती पवार, लीलाबाई पवार, शांताराम पवार, योगेश पवार, श्रीमंत पवार, संदीप पवार, आदी १७ जणांवर गुन्हा नोंद केला आहे.
कृ षीपंप खरेदीत गैरव्यवहार
रत्नागिरी : जिल्हा कृषी विभागातून पाच अश्वशक्तीच्या ११९८ पाण्याच्या पंपांच्या खरेदीची ऑर्डर देण्यात आली आहे. वास्तविक आवश्यकता नसताना ११९८ कृषीपंप खरेदी करण्यात आल्याने त्यात गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता पुढे येत आहे.
मळेवाडमधील आगीत
आठ लाखांची हानी
सिंधुदुर्ग : मळेवाड-पानाचे भोम परिसरात काजू बागेला लागलेल्या आगीत आठशे काजू कलमांसह सात ते आठ हेक्टर क्षेत्रांतील झाडे जळून खाक झाली. यामध्ये शेतकर्‍यांचे सुमारे आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाले. मळेवाड तलाठी भक्ती सावंत यांनी पंचनामा केला. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

Web Title: State / Important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.