लॉन टेनिसची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

By Admin | Published: December 14, 2015 07:12 PM2015-12-14T19:12:06+5:302015-12-14T19:25:42+5:30

नाशिक : जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन व निवेक क्लब सातपूर यांच्यातर्फे जिल्‘ातील मानांकित लॉन टेनिस खेळाडूंसाठी प्रशिक्षण, फिटनेस, मानसिक संतुलन व आहार-विहार विषयक माहिती देणारी कार्यशाळा घेण्यात आली. यात प्रख्यात प्रशिक्षक डॉ. व्हीस पेस यांनी मार्गदर्शन केले.

The state-level workshop of lawn tennis concludes | लॉन टेनिसची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

लॉन टेनिसची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

googlenewsNext

नाशिक : जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन व निवेक क्लब सातपूर यांच्यातर्फे जिल्‘ातील मानांकित लॉन टेनिस खेळाडूंसाठी प्रशिक्षण, फिटनेस, मानसिक संतुलन व आहार-विहार विषयक माहिती देणारी कार्यशाळा घेण्यात आली. यात प्रख्यात प्रशिक्षक डॉ. व्हीस पेस यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली टेनिस कोर्टवर घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत बोलताना डॉ. पेस यांनी प्रशिक्षक हा स्वत: राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू असावा व त्याने आपल्या खेळाडूंसमवेत रोज व्यक्तिगत सराव करावा तरच ते खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळी गाठू शकतात, असे सांगितले. या कार्यशाळेत क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम, मनोज वैद्य, जिलानी शेख, हेमंत बेंद्रे, महेंद्र गोखले आदिंनी मार्गदर्शन केले. पुणे व औरंगाबाद पाठोपाठ नाशकात घेण्यात आलेल्या या कार्यशाळेच्या आयोजनासाठी जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष सत्यजित पाटील, सचिव जितेंद्र सामंत, एस.टेनिस अकॅडमीचे सी.ई.ओ. आदित्य राव, डॉ. विजय थेटे, यती गुजराथी, निवेक क्लब, सातपूरचे अध्यक्ष संदीप सोनार, क्रीडा सचिव रणजित सिंग, प्रतापदादा सोनवणे आदिंनी परिश्रम घेतले.

फोटो स्कॅनिंग
कॅप्शन
राज्य लॉन टेनिस असोसिएशनने आयोजिलेल्या कार्यशाळेप्रसंगी आदित्य राव, श्रीकांत कुमावत, रणजित सिंग, संदीप सोनार, जिलानी शेख, भीष्मराज बाम, मनोज वैद्य, डॉ. व्हीस पेस, हेमंत बेंद्रे, सत्यजित पाटील, डॉ. विजय थेटे व जिल्‘ातील लॉन टेनिस खेळाडू.
-----------------
राज्यस्तरीय टेनिस क्रिकेटसाठी रचनाची निवड
नाशिक : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित विभागीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रचना विद्यालयाचा १७ वर्षाआतील मुलींचा संघ विजेता ठरला असून, त्याची सोलापूर येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
गुरुगोविंद सिंग हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या विभागीय स्पर्धेत सिन्नरच्या चांडक कन्या विद्यालयाच्या संघाचा पराभव करून रचना विद्यालयाने विजेतेपद राखले. क्रीडाशिक्षक यशवंत ठोके, पोपटराव कतवारे, कीर्ती सावंत, कीर्ती गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे, मुख्याध्यापक सुचिता येवला, संगीता टाकळकर आदिंचे मार्गदर्शन लाभले.

फोटो स्कॅनिंग
कॅप्शन
राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेल्या रचना विद्यालयाच्या मुलींच्या संघासमवेत संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे, सुधाकर साळी, सुचेता येवला आदि.
--------------
गंगाधर बदादेचे धावण्याच्या स्पर्धेत यश
नाशिक : तळेगाव अंजनेरी येथील विद्या प्रशाला हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजचा खेळाडू गंगाधर बदादे याने शालेय क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यमंडळातर्फे आयोध्या येथे आयोजित राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत ॲथॅलेटिक्समध्ये १९ वर्षीय वयोगटासाठीच्या ३००० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकविले. बदादे यास राज्य समन्वयक नीलेश राणे, प्रशिक्षक माधव चव्हाण, संजय जोशी आदिंचे मार्गदर्शन लाभले.

फोटो स्कॅनिंग
कॅप्शन
राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या गंगाधर बदादे. समवेत प्राचार्य शैलेजा पाटील, उपमुख्याध्यापक अशोक ढिवरे.
-----------
विवेकानंद विद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न
नाशिक : पंचवटीतील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या इंग्रजी व मराठी माध्यमाचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच संपन्न झाला. संस्थेच्या सचिव वृंदा पाराशरे व सदस्य रमेश मते यावेळी प्रमुखपाहुणे म्हणून उपस्थित होते. ध्वजारोहण व मशाल पेटवून महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यात कबड्डी, खो-खो, डॉजबॉल, रस्सीखेच तसेच व्यक्तिगत प्रकारात धावणे, गोळाफेक, थालीफेक आदि स्पर्धा घेण्यात आल्या. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एम. ए. देशपांडे, पी. पी. परदेशी, जे. एम. चौधरी, आदिंनी परिश्रम घेतले.

Web Title: The state-level workshop of lawn tennis concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.