राज्याची खबरबात - ओडिशात बंडखोर, आयाराम-गयाराम यांचा फटका बसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 06:36 AM2024-04-13T06:36:17+5:302024-04-13T06:37:01+5:30

बीजेडी आणि भाजपमध्ये तुल्यबळ लढत

State News - Rebels, Ayaram-Gayaram will be hit in Odisha | राज्याची खबरबात - ओडिशात बंडखोर, आयाराम-गयाराम यांचा फटका बसणार

राज्याची खबरबात - ओडिशात बंडखोर, आयाराम-गयाराम यांचा फटका बसणार

प्रसाद श. कुलकर्णी

ओडिशामध्ये बंडखोर, आयाराम-गयाराम यांचा सामना पक्षांना करावा लागत आहे. मुख्य पक्ष बिजू जनता दल आणि विरोधी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना बंडखोरांचा सामना करावा लागत असून, पक्षांतर्गत नाराजीलाही तोंड द्यावे लागत आहे. ओडिशामध्ये विधानसभा आणि लोकसभा असे दोन्हीचे पडघम वाजले आहेत. या ठिकाणी वर्चस्व आहे ते नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाचे (बीजेडी). दुसऱ्या क्रमांकाला भारतीय जनता पक्ष आहे. काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी पक्ष आहे. या ठिकाणी खरी लढत आहे, बीजेडी आणि भाजपमध्येच. या दोन्ही पक्षांमध्ये युतीची चर्चा सुरू होती. पण, त्याला यश आले नाही. निवडणुकीतील मुख्य चेहरे पुन्हा पटनाईक आणि नरेंद्र मोदी हेच राहणार आहेत.

आयाराम-गयाराम आणि नाराज उमेदवारांचा फटका या निवडणुकीतही पक्षांना बसणार आहे. बालासोर, बेरहामपूर, कटक यांसारखे लोकसभा मतदारसंघात ती चुरस पाहायला मिळेल. भुवनेश्वर येथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश राउतराय यांचा मुलगा मनमथ यांना बीजेडीने उमेदवारी दिली आहे. 

२०१९च्या निवडणुकांतील स्थिती
पक्ष    विधानसभा     लोकसभा
    निकाल    निकाल
बिजू जनता दल    ११३    १२
भारतीय जनता पक्ष    २३    ८
काँग्रेस    ९    १
एकूण जागा    १४७    २१

तीन ठिकाणी ज्येष्ठ नेत्यांची मुले
ओडिशामध्ये काँग्रेस नेते सुरेश राउतराय यांचा मुलगा मनमथ बीजेडीकडून, चिंतामणी सामंतराय यांची दोन मुले, मनोरंजन सामंतराय भाजपकडून आणि दुसरा मुलगा रवींद्रनाथ सामंतराय काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.
तसेच भाजपचे विजय मोहापात्रा यांचा मुलगा अरविंद मोहापात्रा याला बीजेडीने उमेदवारी दिली आहे. या मुलांचे वडील त्यामुळे अडचणीत आले आहेत. ओडिशा प्रदेश काँग्रेस समितीने नुकतीच सुरेश राउतराय यांना याबाबत नोटीस पाठविली आहे.

बंदोबस्त वाढला, ३५ कंपन्या दाखल 
nनक्षलग्रस्त भागामध्ये केंद्रीय पोलिस दले जास्त द्यावीत, अशी मागणी राज्य पोलिसांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली आहे. ओडिशामध्ये दहा जिल्ह्यांत नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. 
nकेंद्राने आतापर्यंत केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यांच्या ३५ कंपन्या आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) पाच कंपन्या राज्यासाठी दिल्या आहेत.
 

Web Title: State News - Rebels, Ayaram-Gayaram will be hit in Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.