राज्य प्राथमिक शिक्षक संघाची सभा
By admin | Published: July 12, 2015 09:58 PM2015-07-12T21:58:09+5:302015-07-12T21:58:09+5:30
नाशिक : राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा शाखेची त्रैमासिक सभा आचार्य दोंदे भवनामध्ये पार पडली. जिल्हाध्यक्ष राजाराम खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेमध्ये शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर राज्याचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस सुभाष अहिरे, बाजीराव सोनवणे, विनायक ठोंबरे, अर्जुन ताकाठे, प्रमोद शिरसाट आदि उपस्थित होते.
Next
न शिक : राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा शाखेची त्रैमासिक सभा आचार्य दोंदे भवनामध्ये पार पडली. जिल्हाध्यक्ष राजाराम खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेमध्ये शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर राज्याचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस सुभाष अहिरे, बाजीराव सोनवणे, विनायक ठोंबरे, अर्जुन ताकाठे, प्रमोद शिरसाट आदि उपस्थित होते.दरम्यान, सर्व प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारेखेस करण्यात यावे, एलआयसी, आरडीसारख्या अन्य कपाती वेतनातून कराव्यात, प्राथमिक शिक्षकांचा वेतनश्रेणींचा प्रस्तावानुसार वेतन लागू करावे, आदिवासी भागात सेवा करणार्या शिक्षकांना एकस्तर लागू करावा, अशा विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बीएलओच्या कामावर बहिष्काराचा निर्णय कायम ठेवण्यात आला. यावेळी जिल्ातील सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.