राज्य-थोडक्यात-विदर्भ

By admin | Published: February 10, 2015 12:55 AM2015-02-10T00:55:58+5:302015-02-10T00:55:58+5:30

राज्य-थोडक्यात-विदर्भ

State-specific-Vidarbha | राज्य-थोडक्यात-विदर्भ

राज्य-थोडक्यात-विदर्भ

Next
ज्य-थोडक्यात-विदर्भ
रेल्वे रूळ ओलांडताना कटून इसमाचा मृत्यू
देसाईगंज : रेल्वे रूळ ओलांडताना आलेल्या रेल्वेने कटून अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता वडसा रेल्वे स्थानकावर घडली. प्लॅटफार्मपासून दीड किमी अंतरावर रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करताना सदर इसमाचा मृत्यू झाला. अद्यापही मृतक इसमाची ओळख पटली नाही.
व्ही-सॅट यंत्रणेनंतरही बँकांना अडचणच
गडचिरोली : सहकारी बँकांसह सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. मात्र जिल्ह्याच्या अर्ध्या भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीच नाही. त्यावर उपाय म्हणून बँकांनी लाखो रूपये खर्चून व्ही-सॅट यंत्रणा बसविली आहे. मात्र सदर यंत्रणासुध्दा व्यवस्थित काम करीत नसल्याने बँकेचे व्यवहार प्रभावित झाले असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
११ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
चंद्रपूर : जिल्ह्यातील ११ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई विविध पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे दाखल असलेल्यांवर करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी कळविले आहे.
चारित्र्यावर संशय घेऊन ब्लेडने मानेवर वार
यवतमाळ - एका महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या मानेवर ब्लेडने वार करून जखमी केले. ही घटना राळेगाव येथील शिवाजीनगरात घडली. या प्रकरणी सदर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हनुमान महादेव सोळंके (३५) याच्याविरुद्ध राळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कुलगुरूपदासाठी जोरदार रस्सीखेच
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कुलगुरू पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शोध समितीकडे जवळपास ३० अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात विद्यापीठ वर्तुळासोबतच राज्याबाहेरील इच्छुक उमेदवारांचाही समावेश आहे. मागील वेळेपेक्षा बरेच कमी अर्ज आले असले तरी उमेदवारांमध्ये तगडी स्पर्धा राहणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी मागील वर्षी मार्च महिन्यात राजीनामा दिल्यापासून विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरूंची प्रतीक्षा आहे. कुलगुरूंच्या निवडीसाठी डिसेंबर २०१४ मध्ये निवड समितीची घोषणा करण्यात आली.

लग्नास नकार दिल्यामुळे युवतीला मारहाण
नागपूर : लग्न करण्यास नकार दिल्यामुळे एका युवतीच्या घराचे दार तोडून आरोपीने तिला मारहाण केली. लग्न केले नाही तर तुला आणि तुझ्या परिवाराला ठार मारेन, अशी धमकीही आरोपीने दिली. गिट्टीखदानमध्ये शनिवारी ही घटना घडली.
अजहर ऊर्फ राजा असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तो गुंडप्रवृतीचा आहे. शनिवारी दुपारी २ च्या सुमारास तो पीडित मुलीच्या (वय १७) घरासमोर आला. त्याला पाहून मुलीने दार लावून घेतले असता आरोपीने लाथा मारून दार तोडले. तू माझ्यासोबत लग्न कर, असे तो म्हणाला. मुलीने नकार दिला असता त्याने तिला मारहाण केली. एवढेच नव्हे तर माझ्यासोबत लग्न केले नाही तर तुला आणि तुझ्या परिवारातील सदस्यांना ठार मारेन, अशी धमकीही दिली.

Web Title: State-specific-Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.