राज्य-थोडक्यात-विदर्भ
By admin | Published: February 14, 2015 11:52 PM2015-02-14T23:52:11+5:302015-02-14T23:52:11+5:30
राज्य-थोडक्यात-विदर्भ
Next
र ज्य-थोडक्यात-विदर्भरेती चोरणार्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल गोंदिया : पांजरा येथील रेतीची तस्करी करणार्या ट्रॅक्टर चालकावर तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विलास बाबुराव शहारे (३२) याने एमएच३५ जी ११६४ मध्ये एक ब्रास रेती भरून वाहून नेत असताना तलाठी परसराम मरस्कोल्हे (४८) यांनी त्याला अटक केली. सदर घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.प्रवासात दिले गंुगीचे औषधवर्धा : नागपूर येथून रेल्वेने वर्ध्याला परत येत असताना प्रवासादरम्यान तुळजापूर (वघाळा)य् ोथील अतुल खुशाल मोहदुरे (३२) याला अनोळखी व्यक्तीने चिवड्यातून गंुगीचे औषध दिले. संशय येताच अतुल दुसर्या डब्यात गेला आणि प्रवाशांना आपबिती सांगून बेशुद्ध झाला. प्रवाशांनी अतुलच्या पत्नीला भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. अतुलला त्याच्या नातेवाईकांनी वर्धा रेल्वेस्थानकावर उतरवून घेतले. सेवाग्राम रूग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. भांडणात मध्यस्थी करणार्यास मारहाण अमरावती : भांडणादरम्यान सुरू असलेल्या मारहाणीत मध्यस्थी करण्यास गेलेल्या इसमाला डोक्यावर काठीने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत घडली. संतोष तरोणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अनुप दंडे याच्याविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. सासर्याकडून सुनेची फसवणूक नागपूर : पतीच्या नावाने असलेली टाटा एस गाडी पतीच्या मृत्यूनंतर सासर्याने बनावट कागदपत्र तयार करून आपल्या नावावर करून घेतल्याची तक्रार दिल्यावरुन जरीपटका पोलिसांनी सासर्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जया संजय कडू (२८) रा. ७६, हाऊसिंग कॉलनी, लता भापकर यांचे घरी किरायाने, कळमेश्वर आणि आरोपी सदाशिव नत्थुजी कडू (७०) रा. पारडी, ता. कळमेश्वर नात्याने सून व सासरे आहेत. जया कडू यांच्या पतीच्या नावे टाटा एस ही चारचाकी गाडी होती. पतीच्या मृत्यूनंतर ही गाडी ४ एप्रिल २०१२ ते १२ डिसेंबर २०१२ या काळात सासर्याने बनावट कागदपत्र तयार करून स्वत:च्या नावावर केल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.प्रवाशांचा २.३६ लाखांचा मुद्देमाल लंपासनागपूर : रेल्वे प्रवासात गाढ झोपी गेल्याचा फटका दोन प्रवाशांना बसला. त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन संघमित्रा एक्स्प्रेस आणि समरसता एक्स्प्रेसमध्ये अज्ञात आरोपीने गुरुवारी त्यांचे दागिने आणि रोख असा एकूण २.३६ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.