राज्यात निवडणुकांना आॅक्टोबरचा मुहूर्त?

By Admin | Published: September 1, 2014 04:08 AM2014-09-01T04:08:44+5:302014-09-01T04:08:44+5:30

महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू-काश्मीर तसेच झारखंड या चार राज्यांतील विधानसभा निवडणूक वेगवगळ्या काळात होणे अपेक्षित आहे़

The state of the state elections? | राज्यात निवडणुकांना आॅक्टोबरचा मुहूर्त?

राज्यात निवडणुकांना आॅक्टोबरचा मुहूर्त?

googlenewsNext

जयशंकर गुप्त, नवी दिल्ली
महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू-काश्मीर तसेच झारखंड या चार राज्यांतील विधानसभा निवडणूक वेगवगळ्या काळात होणे अपेक्षित आहे़ महाराष्ट्र आणि हरियाणात आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात तर जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये डिसेंबरच्या अखेरीस वा जानेवारीच्या प्रारंभी निवडणूक होण्याची शक्यता आहे़
उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाचे या राज्यांतील निवडणूक कार्यक्रमांवर काम सुरू आहे़ सप्टेंबरच्या मध्यात आयोग महाराष्ट्र व हरियाणातील निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो़ तूर्तास आयोग आणि केंद्रीय गृह मंत्रालयात सुरक्षा दलांची गरज आणि त्याच्या तैनातीच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे़ स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी संवेदनशील तसेच अति संवेदनशील अशा मतदारसंघांची ओळख सुरू आहे़
निमलष्करी दलांच्या गरज आणि त्यांची उपलब्धता यामुळे निवडणुका वेगवेगळ्या वेळी घेण्याचे आयोगाचे मनसुबे
आहेत़ झारखंडमध्ये नक्षलविरोधी
मोहिमेवर निमलष्करी दल तैनात आहे़
तर जम्मू - काश्मिरात दीर्घकाळापासून दहशतवादविरोधी मोहिमेसाठी या दलाला तैनात केले गेले आहे़ गत विधानसभा निवडणुकीदरम्यान जम्मू -काश्मिरात सात टप्प्यांत तर झारखंडमध्ये पाच टप्प्यांत मतदान झाले होते़
जम्मू-काश्मिरात सध्या मतदार याद्यांची फेरतपासणी सुरू आहे़ आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ती पूर्ण होणे अपेक्षित आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The state of the state elections?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.