राज्य-थोडक्यात-नागपूर

By Admin | Published: March 25, 2015 09:10 PM2015-03-25T21:10:00+5:302015-03-25T21:10:00+5:30

राज्य-थोडक्यात-नागपूर

State-wise-Nagpur | राज्य-थोडक्यात-नागपूर

राज्य-थोडक्यात-नागपूर

googlenewsNext
ज्य-थोडक्यात-नागपूर

जमिनीच्या विक्रीत फसवणूक
नागपूर : बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी तहसील पोलिसांत तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी शकील अहमद अब्दुल रहिम, मोसिम अब्दुल जलील, मो. साजीद अख्तर असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी रुहुल अहमद मो. जकारीया (३५) रा. मोमिनपुरा यांची वडिलोपार्जित जमीन होती. या जमिनीची हिस्सेवाटी झाली नसतानाही आरोपींनी त्यांच्या घराचे हिस्सेवाटे झाल्याचे खोटे कागदपत्र तयार करून ही जागा आसीम अब्दुल सलाम व मो. ऐतशाम अब्दुल सलाम यांना विक्री करून दिली. हे प्रकरण उघडकीस आल्यावर रुहुल अहमद मो. जकारीया यांनी तहसील पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
प्रवाशांनी चोरली सोनसाखळी
नागपूर : जयताळा रोड, अहिल्यानगर येथील प्रसन्ना वेणुगोपाल नायर यांनी झाशी राणी चौकातून मेडिकलकडे येण्यासाठी ऑटोत बसल्या. प्रवासादरम्यान ऑटोतील ३० ते ३५ वयोगटातील दोन अनोळखी इसम ऑटोत बसले. या इसमांनी प्रसन्ना यांची नजर चुकवून त्यांच्या बॅगेतील ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली.
दुचाकी स्लिप झाल्याने युवकाचा मृत्यू
नागपूर : ग्रेट नाग रोडवरील करबलाजवळ मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास नीलेश रामचंद्र मदनकर याचे दुचाकी वाहन स्लिप झाले. उपचाराकरिता त्यांना मेडिकलमध्ये घेऊन गेल्यानंतर, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: State-wise-Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.