'मुली OYO रुममध्ये हनुमानाची आरती बोलण्यासाठी जात नाहीत'; हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 03:28 PM2023-04-20T15:28:01+5:302023-04-20T15:29:43+5:30
हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या विधानामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
हरियाणातील महिला आयोगाच्या अध्यक्षा रेनू भाडिया यांच्या एका विधानामुळे वाद सुरू झाला आहे. सायबर क्राईम आणि महिलांच्या छेडछाडीच्या मुद्द्यावर आपले म्हणणे मांडले, यावेळी भाडिया म्हणाल्या, मुली ओयो रूममध्ये हनुमानाच्या आरतीला जात नाहीत. अशा ठिकाणी जाताना मुलींनी स्वतःची काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. आता या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
कट्टर हिंदू, परशुरामांचा वंशज...; अतिक अहमदची हत्या करणाऱ्या लवलेश तिवारीनं असा दिला आपला परिचय
बुधवारी रेणू भाटिया कैथलमधील एका महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. सायबर क्राईम आणि महिलांच्या छेडछाडीवर आपला मुद्दा मांडत रेणू यांनी लिव्ह-इन-रिलेशनशिप कायद्याचाही हवाला दिला. त्या म्हणाल्या की, कायद्यामुळे अनेक तक्रारींमध्ये आयोगाचे हात बांधले जातात.
पुढे बोलताना रेणू म्हणाल्या, आयोगासमोर येणारी बहुतांश प्रकरणे लिव्ह-इन-रिलेशनशिपची आहेत. प्रेमप्रकरणात होणाऱ्या शारीरिक शोषणाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, हनुमानाची आरती करण्यासाठी मुली ओयोच्या खोलीत जात नाहीत.
'लिव्ह-इन-रिलेशनशिप कायद्यामुळे कुटुंबेही कुठेतरी तुटतात. मुलींना माहित नाही का की आपण ओयो अशा ठिकाणी जात असताना हनुमानाची आरती करणार नाही. त्यांच्या मैत्रीत काहीही होऊ शकते याचा त्यांनी विचार करायला हवा, असंही रेणू म्हणाल्या.
"आजच्या मुला-मुलींचा उल्लेख करून अध्यक्ष म्हणाल्या की, मुला-मुलींना महाविद्यालयात पोहोचताच त्यांना पंख मिळतात. त्यांना असे वाटते की त्यांना काय मिळाले आहे ते माहित नाही. प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगावी आणि कुठेही जाण्यापूर्वी सखोल विचार करावा, अशा सूचनाही त्यांनी मुलींना दिल्या.