स्कर्टसचंं विधान धार्मिक स्थळांबाबत - केंद्रीय पर्यटन मंत्री
By admin | Published: August 29, 2016 08:37 AM2016-08-29T08:37:19+5:302016-08-29T15:55:05+5:30
परदेशी पर्यटक महिलांना अजब सल्ला दिल्याने अडचणीत सापडलेल्या केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - परदेशी पर्यटकांनी (महिलांनी) छोट्या गाव - शहरात स्कर्टस घालू नये , रात्रीच्या वेळेस एकटं बाहेर पडू नये असा अजब सल्ला दिल्याने अडचणीत सापडलेल्या केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
स्कर्टस संदर्भातील विधान आपण धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाण्याबाबत केले होते आणि ते ही काळजीपोटी केले होते असे सांगितले. मी सुद्धा दोन मुलींचा पिता आहे. महिलांनी कोणता पोषाख परिधान करावा, कोणता करु नये हे मी सांगणार नाही. अतिथी देवो भवची आपली संस्कृती आहे. अशा बंदीची कल्पनाही करु शकत नाही. पण काळजी घेणे गुन्हा असू शकत नाही अशी सारवासारव त्यांनी केली.
परदेशी पर्यटक जेव्हा भारतात येतात, तेव्हा विमानतळावर त्यांचे स्वागत करताना एक कीट दिला जातो, ज्यामध्ये एका पुस्तकात ' काय करावे व काय करू नये' अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामध्येच परदेशी महिलांना असे काही सल्ले देण्यात आले असून आता त्यावरूनच महेश शर्मा यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
'परदेशी पर्यटकांनी भारतात आल्यावर काह गोष्टी पाळाव्यात. एअरपोर्टवरून निघताना ज्या टॅक्सीमध्ये बसाल, त्या टॅक्सीच्या नंबरप्लेटचा फोटो काढून, तो आपले मित्र वा नातेवाईकांना पाठवून ठेवावा. छोटी गावे वा शहरात रात्री-अपरात्री एकट्याने फिरू नये, (महिलांनी) स्कर्ट्स घालू नये' अशा सूचना त्या किटमध्ये असल्याचे शर्मा यांनी सांगितले. मात्र पर्यटकांना पेहेरावावरून देण्यात आलेली ही सूचना सर्वांनाच रुचलेली नसून त्यांच्यावर टीका करण्यात येक आहे. त्यानंतर शर्मा यांनी सारवासारव करत, आपण कोणालाही कपड्यांवरून सल्ला दिलेला नसल्याचे स्पष्ट केले.
आणखी वाचा :