राज्याची वीज निर्मिती घटली

By admin | Published: January 22, 2016 12:10 AM2016-01-22T00:10:24+5:302016-01-22T00:10:24+5:30

११ संच बंद : दीपनगर निर्मितीत प्रथम

The state's electricity generation has declined | राज्याची वीज निर्मिती घटली

राज्याची वीज निर्मिती घटली

Next
संच बंद : दीपनगर निर्मितीत प्रथम
जळगाव : महाजेनकोच्या सात वीज निर्मिती प्रकल्पातील ११ संच विविध तांत्रिक कारणांनी बंद आहे. परिणामी राज्याच्या वीज निर्मिर्तीत घट झाली आहे. मागणी व निर्मितीतील तूट भरुन काढण्यासाठी एनटीपीसीकडून चार हजार ३१४ मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र या परिस्थितीत दीपनगर प्रकल्पातून गुरुवारी सर्वाधिक एक हजार ८० मेगावॅट निर्मिती होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यातील महाजेनकोच्या प्रकल्पातील ११ संच गुरुवारी तांत्रीक कारणांनी बंद होते. याचा परिणाम विजनिर्मितीवर झाला. उन्हाळ्यात विजेची मागणीत वाढ असताना राज्यातून १३ ते १४ हजार मेगावॅटपर्यंत विज निर्मिती होत होती. मात्र सध्या मागणी कमी असतांनाही विज निर्मितीत घट आली आहे. गुरुवारी राज्यात ११ हजार ७३५ मेगावॅट इतकी निर्मिती झाली. तर मागणी १६हजार ६७७ मेगावॅट होती. निर्मिती व मागणीची तुट भरुन काढण्यासाठी एनटीपीसीकडून चार हजार ९४२ मेगावॅट वीजेचा पुरवठा करण्यात येत असली तरीही ६२८ मेगावॅटचा तुटवडा जाणवत आहे.
११ संच बंद
बंद संचामध्ये परळी पाच, चंद्रपूर तीन, कोराडी दोन, खापरखेडा एक या संचांचा समावेश आहे. यातील परळी प्रकल्प पाण्याच्या समस्येमुुळे बंद आहे. चंद्रपुरचा एक संच प्रदुषण समस्या तर दोन तांत्रीक अडचणीमुळे बंद आहे. कोराडीचा एक संच आधुनिकीकरणासाठी सहा महिने बंद असणार आहे तर दुसरा तांत्रीक कारणांसाठी बंद आहे. खापरखेडाचा एक संच तांत्रीक कारणासाठी बंद आहे.
१५ दिवसांचा कोळसा शिल्लक
विज निर्मितीवर परिणाम होण्यासाठी कोळस्याची समस्या नाही. राज्यातील प्रकल्पांना १५ दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक आहे. उपलब्ध कोळसा चांगल्या दर्जाचा आहे. शिवाय ५ते ७ टक्के विदेशी चांगल्या प्रतीच्या कोळशाचा उपयोग करण्यात येत आहे. असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दीपनगर प्रथम
महाजेनकोच्या संपूर्ण सात प्रकल्पांमधून होणार्‍या वीज निर्मितीत गुरुवारी दीपनगर प्रकल्पातून सर्वाधिक म्हणजे एक हजार ८० मेगावॅट वीज निर्मिती झाली. वीज निर्मिती अशी, चंद्रपूर एक हजार ८१ मेगावॅट, खापरखेडा ८४३, कोराडी ६३०,नाशिक ५२५, पारस ४२९, पारस शुन्य.
उत्तर महाराष्ट्राची निर्मिती १६९७ मे.वॅ.
उत्तर महाराष्ट्रातील दीपनगर, नाशिक व साक्री सोलर (८६ मेगावॅट) या तीन प्रकल्पातून १ हजार ६९७ मेगावॅट निर्मिती झाली.
....(जोड आहे)....

Web Title: The state's electricity generation has declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.