साखरेचे नियंत्रण करण्याचा अधिकार राज्यांना
By admin | Published: October 28, 2016 04:58 AM2016-10-28T04:58:13+5:302016-10-28T04:58:13+5:30
साखरेची साठवण आणि दरासह पुरवठा, खरेदी-विक्री तसेच उत्पादनासंदर्भात नियंत्रण करण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे. यामुळे साखर उत्पादक
Next
नवी दिल्ली : साखरेची साठवण आणि दरासह पुरवठा, खरेदी-विक्री तसेच उत्पादनासंदर्भात नियंत्रण करण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे. यामुळे साखर उत्पादक राज्यांना गरजेनुसार साठवणुकीची मर्यादा आणि आवश्यक परवान्यासंबंधीचे नियंत्रण करणारे आदेश जारी करता येतील. तसेच साखरेच्या मर्यादित साठ्यासंदर्भातील आदेशाची मुदत आणखी सहा महिन्यांसाठी वाढवून २८ एप्रिल २०१७ पर्यंत वाढविली.