‘इथेनॉल पुरवठा अटी राज्यांनी शिथिल कराव्यात’
By admin | Published: February 21, 2015 02:47 AM2015-02-21T02:47:31+5:302015-02-21T02:47:31+5:30
पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकारने कारखान्यांकरिता अटी शिथिल कराव्यात, असे आवाहन केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी केले आहे.
नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकारने कारखान्यांकरिता अटी शिथिल कराव्यात, असे आवाहन केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी केले आहे. उसाची थकबाकी कशी फेडायची याची काळजी कारखान्यांसह पासवान यांनाही असल्यामुळे त्यांनी हे आवाहन केले.
अटी शिथिल केल्यास कारखान्यांना रोख रक्कम उपलब्ध होईल व त्यातून थकबाकी परत करणे सोयीचे होईल, असे पासवान यांनी उसाच्या प्रमुख उत्पादक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. कारखान्यांना बँकांकडून व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देणे, कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदान देणे आदी उपायांचा त्यात समावेश आहे. या अनुदानामुळेही कारखाने शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेवर देऊ शकतील.