उत्तर प्रदेशात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 04:45 AM2019-09-15T04:45:17+5:302019-09-15T04:45:28+5:30

उत्तर प्रदेशातील जालोनमधील महात्मा गांधी महाविद्यालयातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले आहे.

A statue of Mahatma Gandhi in Uttar Pradesh | उत्तर प्रदेशात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना

उत्तर प्रदेशात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना

googlenewsNext

लखनौ : उत्तर प्रदेशातील जालोनमधील महात्मा गांधी महाविद्यालयातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले आहे. राज्यात या घटनेची संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, जालोन तसेच काही शहरांत विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराच्या निषेधार्थ आंदोलनही केले.
या प्रकारानंतर पोलिसांनी लगेचच तेथे महात्मा गांधी यांचा दुसरा पुतळा बसवला आणि स्थानिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना कोणी केली, याचा आम्ही शोध घेत आहोत.
या घटनेचा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी निषेध केला आहे. त्या म्हणाल्या, की पुतळ्याची विटंबना केल्यामुळे गांधीजींचे माहात्म्य कमी होणार नाही.

Web Title: A statue of Mahatma Gandhi in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.