नटराजची मूर्ती, जगाचा नकाशा, अन्...; पंतप्रधान कार्यालय आतून कसे दिसते?, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 04:02 PM2023-12-27T16:02:33+5:302023-12-27T16:03:27+5:30
पंतप्रधान निवासस्थानाची वास्तू आणि सौंदर्य पाहून मुले थक्क झाली. व्हिडिओमध्ये मुले खूप आनंदी दिसत आहेत.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ख्रिसमसच्या निमित्ताने काही शाळकरी मुलांना आपल्या निवासस्थानी बोलावले. मुले पूर्ण उत्साहात तेथे पोहोचली आणि त्यांनी पंतप्रधानांचे निवासस्थान आणि कार्यालयाचे भव्य दृश्य पाहिले. पंतप्रधान निवासस्थानाची वास्तू आणि सौंदर्य पाहून मुले थक्क झाली. व्हिडिओमध्ये मुले खूप आनंदी दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: यासंबंधीचा व्हिडिओ 'एक्स' सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पंतप्रधान कार्यालयातील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठका ज्या खोलीत होतात त्या खोलीलाही त्यांनी भेट दिली. मुलांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या विविध भागांचा आढावा घेतला.
पंतप्रधान कार्यालयात काय दिसले?
- नटराजाची मूर्ती
- अशोक स्तंभाची प्रतिकृती
- खूप सुंदर चित्रे
- कार्यालयाच्या छतावर जगाचा नकाशा
- दिव्यांमधून भव्य सजावट
- काम कुठे, काय आणि कसे केले जाते? कॅबिनेट मीटिंग हॉल इ.
- विशेष अतिथी कक्ष
Curious young minds traversing across 7, LKM clearly made for a great experience. Seems my office passed the ultimate test - they gave it a thumbs up! pic.twitter.com/Eampc8jlHq
— Narendra Modi (@narendramodi) December 27, 2023
व्हिडिओमध्ये आणखी काय?
पंतप्रधानांनी शेअर केलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला, विद्यार्थ्यांना मेरी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा गाताना ऐकू येते. यादरम्यान पंतप्रधान ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांशी बोलत आहेत. त्यांनी काही मुलांशी बोलून विचारले की त्यांनी पंतप्रधानांचे घर पाहिले आहे का? याचे उत्तर मुलांनी नाही, असे दिले. यावर पीएम मोदी म्हणाले की, माझी टीम तुम्हाला तिथे फेरफटका मारण्यासाठी घेऊन जाईल.