'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बनतोय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र, दिवाळीमध्ये केली कोट्यवधीची कमाई   

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 10:45 AM2018-11-11T10:45:25+5:302018-11-11T10:50:20+5:30

नर्मदा नदीतील सरदार सरोरवरामध्ये उभारण्यात आलेला 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' सर्वसामान्य पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनला आहे

'Statue of Unity' Is biggest attraction for tourist | 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बनतोय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र, दिवाळीमध्ये केली कोट्यवधीची कमाई   

'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बनतोय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र, दिवाळीमध्ये केली कोट्यवधीची कमाई   

Next
ठळक मुद्देस्टॅच्यू ऑफ युनिटीवरून राजकीय वर्तुळ आणि समाजापमध्ये मतमतांतरे सर्वसामान्य पर्यटकांमध्ये मात्र स्टॅच्यू ऑफ युनिटी आकर्षणाचे केंद्र दिवाळीच्या सुट्टीमध्येच सुमारे 75 हजार पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेटतिकीटविक्रीमधूनच सुमारे अडीच कोटी रुपयांची कमाई

सूरत - नर्मदा नदीतील सरदार सरोरवरामध्ये उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीवरून राजकीय वर्तुळ आणि समाजापमध्ये मतमतांतरे निर्माण झाली होती. पण सर्वसामान्य पर्यटकांमध्ये मात्र स्टॅच्यू ऑफ युनिटी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. येथे उभारण्यात आलेली सरदार पटेल यांची भव्य प्रतिमा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येत आहेत. केवळ दिवाळीच्या सुट्टीमध्येच सुमारे 75 हजार पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली असून, केवळ येथील तिकीटविक्रीमधूनच सुमारे अडीच कोटी रुपयांची कमाई झाली आहे. 

 सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते  31 ऑक्टोबर रोजी लोकार्पण झाले होते. मात्र या पुतळ्याची प्रवेश फी ही जगप्रसिद्ध ताहमहलच्या प्रवेश फीपेक्षा सातपट अधिक महाग असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तरीही येथे भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढत आहे. सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडचे मुख्य अभियंता पी.सी. व्यास यांनी सांगितले की, केवळ गुजरातच नाही तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामधूनही येथे पर्यटक येत आहेत.

या पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे. लॉर्सन अॅन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचलित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती. स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो कमी वेळेत तयार करण्यात आला आहे. पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे. 

Web Title: 'Statue of Unity' Is biggest attraction for tourist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.