सतर्क राहा, पुढचे ४० दिवस महत्त्वाचे; जानेवारीत रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 06:04 AM2022-12-29T06:04:42+5:302022-12-29T06:05:21+5:30
देशात जानेवारी महिन्याच्या मध्याला कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आगामी ४० दिवस हे भारतासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. देशात जानेवारी महिन्याच्या मध्याला कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी बुधवारी सांगितले. पूर्व आशियामध्ये कोरोनाची नवी लाट आली की तिचा प्रभाव भारतातही ३० ते ३५ दिवस राहतो, असे याआधी निदर्शनास आले होते. त्याच गोष्टीची पुनरावृत्ती आताही होऊ शकते.
भारतात समजा कोरोनाची नवी लाट आली तरी त्यांच्या संसर्गाची तीव्रता कमी असेल. त्यामुळे बाधितांना रुग्णालयात दाखल करण्याचे किंवा मृत्यूचे प्रमाणही कमी असणार आहे. गेल्या दोन दिवसांत विदेशातून भारतात आलेल्या सहा हजार प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील ३९ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. चीन व दक्षिण कोरियामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने केंद्र सरकार सतर्क झाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"