अटक करताना मर्यादेत राहा, पोलिसांवर कारवाईचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:20 IST2025-04-04T10:20:20+5:302025-04-04T10:20:51+5:30
Court News: अटकेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा देत मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे .

अटक करताना मर्यादेत राहा, पोलिसांवर कारवाईचा इशारा
- डॉ. खुशालचंद बाहेती
नवी दिल्ली - अटकेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा देत मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे .
विजयपाल यादवचा शेजाऱ्याशी वाद होता. यादव यांनी आरोप केला की, त्यांना १३ एप्रिल २०२२ रोजी हरियाणा पोलिसांनी अर्नेश कुमार मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून अटक केली.
त्यांना अटकेच्या ठिकाणी आणि नंतर पोलिस ठाण्यात मारहाण केली. त्यांना ताब्यात घेताच त्यांच्या भावाने त्याबाबत पोलिस अधीक्षकांना ई-मेल पाठवला. ताब्यात घेतल्यानंतर सुमारे दोन तासांनी एसपींना पाठवलेल्या ई-मेलमुळे चिडून त्यांच्याविरुद्ध ३५३ आयपीसीचा गुन्हा दाखल केला.
यादवने अर्नेश कुमार मार्गदर्शक तत्त्वांच्या उल्लंघनाबद्दल पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली. त्यावर पोलिसांचे प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरत हायकोर्टाने यादव यांची याचिका फेटाळली.
यादव यांनी सुप्रीम कोर्टात अपिल केले. सुप्रीम कोर्टाने हरियाणाच्या पोलिस महासंचालकांना वैयक्तिक हजर राहण्याचे निर्देश दिले. कोर्टाने म्हटले की, कागदपत्रांवरून पोलिसांकडून मारहाण झाल्याचे पुरावे आहेत. पोलिसांकडून मर्यादा ओलांडण्याची अपेक्षा नाही. भविष्यात सावधगिरी बाळगावी.