Subramanian Swamy : "परकीय चलन गंगाजळीत सातत्याने घट होतेय", RBI च्या आकडेवारीवरून सुब्रमण्यम स्वामींचा नरेंद्र मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 19:04 IST2022-08-06T19:03:59+5:302022-08-06T19:04:28+5:30
Subramanian Swamy : याआधी सुद्धा सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Subramanian Swamy : "परकीय चलन गंगाजळीत सातत्याने घट होतेय", RBI च्या आकडेवारीवरून सुब्रमण्यम स्वामींचा नरेंद्र मोदींवर निशाणा
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीचा संदर्भ देत 2021 पासून परकीय चलनाच्या गंगाजळीत सातत्याने घट होत आहे. हे केवळ कोरोना महामारीमुळे होऊ शकत नाही, असे म्हणत सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
याआधी सुद्धा सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, अलीकडच्या काळात भाजपचे सुब्रमण्यम स्वामी अतिशय आक्रमक झाले असून विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहेत. याआधी सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या बहाण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सही का करत नाहीत, असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता.
चार वर्षांपासून ही फाइल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डेस्कवर पडून असल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. याचबरोबर,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणतेही कारण नसताना प्रल्हाद पटेल यांचे मंत्रालय बदलले आणि डोवाल यांनी फोन टॅपिंगसाठी त्यांच्या पत्नीच्या फोनमध्ये पेगासस टाकल्याचा मोठा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी कोणत्या-ना- कोणत्या कारणाने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहेत. मात्र, सुब्रमण्यम स्वामी यांच्या आरोपांवर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नाही.
परकीय चलनाचा साठा चार आठवड्यांनंतर वाढला
परकीय चलनाच्या साठ्याबद्दल बोलायचे झाल्यास, देशांतर्गत पोर्टफोलिओ गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतीय बाजाराकडे वळले आहेत, ज्यानंतर 29 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात 2.4 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. याआधी, सलग चार आठवडे त्यात घट झाली होती. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, 29 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 573.875 अब्ज डॉलर होता. त्याचवेळी, 15 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात, परकीय चलनाच्या साठ्यात 7.541 अब्ज डॉलरची घट झाली आहे. शिवाय, 22 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात ते 571.5 अब्ज डॉलर होते.