खरीप पिकांच्या हमी भावात घसघशीत वाढ; केंद्र सरकारने दिला शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 06:17 AM2023-06-08T06:17:37+5:302023-06-08T06:17:56+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

steep rise in guaranteed prices for kharif crops central government has given relief to the farmers | खरीप पिकांच्या हमी भावात घसघशीत वाढ; केंद्र सरकारने दिला शेतकऱ्यांना दिलासा

खरीप पिकांच्या हमी भावात घसघशीत वाढ; केंद्र सरकारने दिला शेतकऱ्यांना दिलासा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : खरीप हंगामातील २०२३-२४ च्या विपणन हंगामासाठी आज केंद्रातील मोदी सरकारने सर्व अनिवार्य पिकांच्या हमीभावात (किमान आधारभूत किंमत) घसघशीत वाढीचा निर्णय जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जास्त हमीभाव देण्याच्या सरकारच्या आश्वासनानुसार दर जाहीर केले असून, गेल्या अनेक वर्षांमधील ही सर्वाधिक वाढ असल्याचा दावा केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांनी केला. चार वर्षांमध्ये प्रतिकूल स्थितीचा सामना करावा लागूनही २०२२-२३ मध्ये देशात एकूण विक्रमी ३३०.५ दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन झाले. ही वाढ १४.९ दशलक्ष टनांची असून, पाच वर्षांतील सर्वाधिक वाढ आहे, असे गोयल यांनी सांगितले.

खरीप हंगामातील पीके

२०२३-२४ नवे हमी भाव दिलेली वाढ

कापूस (मध्यम धागा)  ₹६६२० ₹५४०
कापूस (लांब धागा)    ₹७०२०    ₹६४०
सोयाबीन (पिवळा)    ₹४६००    ₹३००
तूर    ₹७०००    ₹४००
रागी    ₹३८४६    ₹२६८
ज्वारी संकरित    ₹३१८०    ₹२१०
ज्वारी मालदंडी    ₹३२२५    ₹२३५
नाचणी    ₹३८४६    ₹२६८
बाजरी    ₹२५००    ₹१५०
धान सामान्य    ₹२१८३    ₹१४३
धान अ श्रेणी    ₹२२०३    ₹१४३
मका    ₹२०९०    ₹१२८
उडद    ₹६९५०    ₹३५०
मूग    ₹८५५८    ₹८०३
तीळ    ₹८६३५    ₹८०५
भुईमूग    ₹६३७७    ₹५२७
सूर्यफूल बिया    ₹६७६०    ₹३६०
कारळे     ₹७७३४   ₹४४७
(किमान आधारभूत किंमत)

 

Web Title: steep rise in guaranteed prices for kharif crops central government has given relief to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.