स्टीव्ह जॉब्स यांनी झुकेरबर्गला 'या' मंदिरामध्ये जाण्याचा दिला सल्ला

By admin | Published: October 19, 2016 02:40 PM2016-10-19T14:40:37+5:302016-10-19T14:40:37+5:30

फेसबुकच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये संस्थापक मार्क झुकेरबर्गने एका भारतीय मंदिरात येऊन दर्शन घेतले होते.

Steve Jobs advised Zuckerberg to go to this 'temple' | स्टीव्ह जॉब्स यांनी झुकेरबर्गला 'या' मंदिरामध्ये जाण्याचा दिला सल्ला

स्टीव्ह जॉब्स यांनी झुकेरबर्गला 'या' मंदिरामध्ये जाण्याचा दिला सल्ला

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० - फेसबुकच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कंपनी अडचणीमध्ये असताना संस्थापक मार्क झुकेरबर्गने एका भारतीय मंदिरात येऊन दर्शन घेतले होते. अॅपलचे सहसंस्थापक आणि माजी सीईओ स्टीव्ह जॉब्स यांच्या सल्ल्यावरुन मार्क भारतात आला होता. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौ-यामध्ये मार्कने स्वत: ही माहिती दिली. जॉब्स यांनी झुकेरबर्गला नैनीताल येथील कांची धाम आश्रमाला भेट देण्याचा सल्ला दिला होता. 
 
१९७० च्या दशकात जॉब्स स्वत: या आश्रमामध्ये आले होते. पंतनगर येथे आल्यानंतर झुकेरबर्ग नीम करोली बाबांच्या आश्रमामध्ये गेला होता. ७० च्या दशकात मानसिक शांतीच्या शोध जॉब्स येथे आले होते. भारतात येऊन अध्यात्मिक ज्ञान प्राप्ती केल्यानंतर जॉब्स पुन्हा अमेरिकेत गेले व तिथे अॅपल या जगप्रसिद्ध कंपनीची उभारणी केली. 

Web Title: Steve Jobs advised Zuckerberg to go to this 'temple'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.