राष्ट्रपती भवनाकडे निघालेल्या ‘जेएनयू’ विद्यार्थ्यांवर लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 04:51 AM2020-01-10T04:51:44+5:302020-01-10T04:51:59+5:30

कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने निघालेल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी राजपथवार रोखले.

Sticks to 'JNU' students heading to Rashtrapati Bhavan | राष्ट्रपती भवनाकडे निघालेल्या ‘जेएनयू’ विद्यार्थ्यांवर लाठीमार

राष्ट्रपती भवनाकडे निघालेल्या ‘जेएनयू’ विद्यार्थ्यांवर लाठीमार

Next

नवी दिल्ली : विद्यापीठाच्या आवारात शिरून ‘बुरखाधारी गुंंडां’नी केलेला हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने निघालेल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी राजपथवार रोखले.
यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाली व सौम्य छडीमारही करण्यात आला. काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यातही घतले.
जेएनयू विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी आणि केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेली चर्चा ‘असमाधानकारक’ झाल्याचे सांगून संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष यांनी ‘चलो राष्ट्रपती भवन’चा नारा दिला होता. याआधी धरण्यासाठी जमलेल्या विद्यापीठातील विद्यार्थी व शिक्षकांच्या एका गटास पोलिसांनी शास्त्री भवनजवळ अडविले.
राजकारण बाजूला ठेवावे लागेल
आजच्या चर्चेनंतर मान संसाधन मंत्रालयाचे सचिव अमित खरे म्हणाले की, विद्यापीठातील असंतोषावर कुलगुरुंना हटविणे हा उपाय नाही. फीवाढीच्या ज्या मूळ विषयातून हे सर्व झाले तो प्रश्न आधी हाताळावा लागेल. एकाला काढून दुसºयाला नेमण्याने काही होणार नाही. राजकारण बाजूला ठेवून शैक्षणिक बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. उद्या शुक्रवारी पुन्हा चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Sticks to 'JNU' students heading to Rashtrapati Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.