गस्तीच्या पोलिसांनी उधळला चोरीचा डाव
By Admin | Published: September 18, 2016 10:35 PM2016-09-18T22:35:57+5:302016-09-18T22:35:57+5:30
जळगाव: मध्यरात्री दुकान फोडण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने साहित्यासह पकडल्याने त्यांचा चोरी करण्याचा डाव फसला आहे. दरम्यान, तिघांनी दोन दिवसापूर्वी सेंट्रल फुले मार्केटमध्ये चार दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. यातील एक चोरटा सराईत आहेत. तिन्ही अल्पवयीन असून गेंदालाल मील भागातील रहिवाशी आहेत.
ज गाव: मध्यरात्री दुकान फोडण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने साहित्यासह पकडल्याने त्यांचा चोरी करण्याचा डाव फसला आहे. दरम्यान, तिघांनी दोन दिवसापूर्वी सेंट्रल फुले मार्केटमध्ये चार दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. यातील एक चोरटा सराईत आहेत. तिन्ही अल्पवयीन असून गेंदालाल मील भागातील रहिवाशी आहेत.शहर पोलीस स्टेशनचे विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, दुष्यंत खैरनार व संजय भालेराव शनिवारी रात्री गस्तीवर असताना फुले मार्केटमध्ये वॉचमन असलेल्या रतन बहादूर गोर यांना दोन जण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले.दोघांना हटकले असता त्यांनी रतन याच्याशी वाद घातला. त्यांच्या हातात टॉमी होती. त्यामुळे रतन याने हा प्रकार गस्तीवर असलेल्या पोलिसांना सांगितला, त्यांनी लागलीच घटनास्थळ गाठले, तितक्यात त्यातील एक जण फरार झाला व एक जण हातात लागला. पोलीस स्टेशनला आणून त्याची चौकशी केली असता आणखी दोन जणांची नावे समोर आली.त्यांच्या मदतीने फुले मार्केटमध्ये चार दुकाने फोडल्याचे त्याने सांगितले.चोरीच्या पैशात केली मौजमस्तीफुले मार्केटमधील श्री एजन्सीज या दुकानातून १३ हजार रुपये रोख चोरले होते, त्या पैशात तिघांनी मौजमस्ती केल्याचे तपासात निष्पन्न झाले. ताब्यात घेण्यात आलेल्या एकाची माहितीवरुन रविवारी सकाळी दोघांना गेंदालाल मील भागातून ताब्यात घेण्यात आले. यातील एक जण विशेष नावाने परिचीत आहे. त्याच्यावर यापूर्वी शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासाधिकारी दीपक गंधाले यांनी दिली. दरम्यान, तिघांकडून दोन हजार रुपये रोख व लोखंडी टॉमी जप्त करण्यात आली आहे.