धक्कादायक! पोटदुखी, उलट्या...; हॉस्टेलमध्ये जेवल्यावर 100 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 10:39 AM2024-03-09T10:39:04+5:302024-03-09T10:39:38+5:30

विद्यार्थ्यांनी जेवण करताच त्यांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या.

stomach ache vomiting more than 100 students got food poisoning after eating food in noida | धक्कादायक! पोटदुखी, उलट्या...; हॉस्टेलमध्ये जेवल्यावर 100 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा

धक्कादायक! पोटदुखी, उलट्या...; हॉस्टेलमध्ये जेवल्यावर 100 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा

ग्रेटर नोएडामध्ये खराब झालेलं अन्न खाल्ल्याने 100 हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. हॉस्टेलच्या मेसमध्ये सर्वांना जेवण देण्यात आलं. विद्यार्थ्यांनी जेवण करताच त्यांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. या घटनेने हॉस्टेलमध्ये एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण ग्रेटर नोएडातील नॉलेज पार्क पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या आर्यन रेसिडेन्सी आणि लॉयड हॉस्टेलशी संबंधित आहे. तेथे राहणारे 100 हून अधिक विविध महाविद्यालयातील विद्यार्थी अन्न खाल्ल्यानंतर आजारी पडले. त्यांना पोटदुखी आणि उलट्या होऊ लागल्या. परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून हॉस्टेल संचालक घाबरले. त्यानंतर आजारी विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्याचे काम सुरू करण्यात आलं. अनेक विद्यार्थी स्वत:हून रुग्णालयात पोहोचले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हॉस्टेल संचालकावर निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्यावर पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण नॉलेज पार्क पोलीस स्टेशनच्या निदर्शनात आहे. 8 मार्च रोजी सायंकाळी विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आलं. त्यानंतर त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक आहे. तसेच शांतता व सुव्यवस्था राखली जाते. 

नॉलेज पार्क पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.रात्री साडेनऊच्या सुमारास जेवल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली होती, असे सांगण्यात येत आहे. तक्रारीच्या आधारे पोलीस आणि अन्न विभागाचे पथक तपास करत आहे. चौकशीनंतर कारवाई केली जाईल. कारण, यापूर्वीही काही हॉस्टेलविरोधात अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी जेवणाच्या गुणवत्तेशी तडजोड केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
 

Web Title: stomach ache vomiting more than 100 students got food poisoning after eating food in noida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.