अयोध्येत आणले दगड

By admin | Published: December 22, 2015 02:54 AM2015-12-22T02:54:00+5:302015-12-22T02:54:00+5:30

अयोध्या येथे रविवारी दोन ट्रक दगड आणण्यात आल्यावरून उत्तर प्रदेश सरकारने आपल्या गुप्तचर विभागाला ‘गोपनीय’ अहवाल मागितला आहे.

Stone brought in Ayodhya | अयोध्येत आणले दगड

अयोध्येत आणले दगड

Next

लखनौ : अयोध्या येथे रविवारी दोन ट्रक दगड आणण्यात आल्यावरून उत्तर प्रदेश सरकारने आपल्या गुप्तचर विभागाला ‘गोपनीय’ अहवाल मागितला आहे. अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी देशभरातून दगड आणण्याची घोषणा विश्व हिंदू परिषदेने सहा महिन्यांपूर्वी केली होती. त्यानंतर रविवारी दगड भरलेले दोन ट्रक अयोध्येत दाखल झाले.
‘अयोध्येतील या घडामोडीवर राज्य सरकारने अतिरिक्त महासंचालकांकडून (गुप्तचर) गोपनीय अहवाल मागितला आहे,’ अशी माहिती पोलीस महानिरीक्षक ए. सतीश गणेश यांनी दिली.
रविवारी दगड भरलेले दोन ट्रक अयोध्येतील रामसेवकपुरम या विहिंपच्या मालकीच्या जागेवर आणण्यात आले.
हे दगड उतरविल्यानंतर तेथे महंत नृत्य गोपाल दास यांच्या हस्ते ‘शिलापूजन’ही करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Stone brought in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.