यात्रेवर दगडफेफ; जवानाचा मृत्यू, अनेक वाहने पेटवली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 11:06 AM2023-08-01T11:06:18+5:302023-08-01T11:07:35+5:30

मेवातचे डीएसपी सज्जन सिंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. गुरुग्राम क्राइम ब्रँचचे इन्स्पेक्टर अनिल यांच्या पोटात गोळी लागली आहे. 

Stone pelting on pilgrimage; A jawan died, many vehicles were set on fire | यात्रेवर दगडफेफ; जवानाचा मृत्यू, अनेक वाहने पेटवली

यात्रेवर दगडफेफ; जवानाचा मृत्यू, अनेक वाहने पेटवली

googlenewsNext

हरियाणातील नूहमध्ये सोमवारी विश्व  हिंदू परिषदेने काढलेल्या ब्रजमंडल यात्रेदरम्यान प्रचंड हिंसाचार झाला. दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर तीन डझनहून अधिक वाहने जाळण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. जमावाने केलेल्या गोळीबारात एका होमगार्ड जवानाचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारात अनेक लोक आणि पोलीस जखमी झाले आहेत. मेवातचे डीएसपी सज्जन सिंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. गुरुग्राम क्राइम ब्रँचचे इन्स्पेक्टर अनिल यांच्या पोटात गोळी लागली आहे. 

शाळेच्या बसवर हल्ला
हल्लेखोरांनी दगडफेक करून बाहेर उभ्या असलेल्या वाहनांना आग लावली. हल्लेखोरांच्या हातात बंदूका होत्या. हा गोंधळ पाहून पोलिसांना जीव वाचवून पळ काढावा लागला. हल्लेखोरांनी स्कूल बसचीही तोडफोड केली. हल्लेखोरांनी बसची लूट करत पोलिस ठाण्याला तोडण्यासाठी ही बस पोलीस ठाण्यावर धडकवली.

कलम १४४ लागू, दोन दिवस इंटरनेटबंदी
जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचा सामना करण्यासाठी इतर जिल्ह्यांमधून पोलिस दलाला पाचारण केले आहे, संपूर्ण जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्याबरोबरच दोन दिवस इंटरनेटही बंद ठेवण्यात आले होते. जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत.

Web Title: Stone pelting on pilgrimage; A jawan died, many vehicles were set on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.