वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक का केली? मोठं कारण आलं समोर, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 04:56 PM2023-07-11T16:56:44+5:302023-07-11T16:58:06+5:30
आज सकाळीच वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली होती.
भारतीय रेल्वेत महत्वपूर्ण बदल करण्यात येत आहेत, भारतीय रेल्वेत आता वंदे भारत एक्सप्रेसच्या नव्या गाड्या आल्या आहेत. सुरुवातीपासून वंदे भारत गाड्यांवरती दगडफेक झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, कोलकाता येथे सुरुवातीला दगडफेक झाली होती. तर आज सकाळी अयोध्या येथील रौनाही ठाणे परिसरात वंदे भारतवर दगडफेक झाली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, ताब्यात घेतलेल्यांमध्ये वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्ये येथील रौनाही पोलीस ठाण्याजवळ वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाली होती. यावेळी रेल्वेत मोठा गोंधळ झाला होता. रेल्वे पोलिसांनी लगेच या प्रकरणाची पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुन्ना पासवानने सांगितले की, ९ जुलै रोजी त्याच ट्रेनच्या धडकेने त्याच्या सहा शेळ्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे संतापलेल्या त्याने आपल्या दोन मुलांसह रेल्वेवर दगडफेक केली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दगडफेकीत कोच क्रमांक ३३ मधील सीट क्रमांक ३३,३४, २०, २१, कोच C3 मधील २२, १०, ११, १२ कोच C5 आणि कोच E1 मधील सीट क्रमांक ३५ ३६ जवळील काचांचे नुकसान झाले.
शरद पवारही चुकलेले, मग काय गोळ्या घालता का? सदाभाऊ खोतांचे 'सैतान'वर स्पष्टीकरण
दगडफेकीची ही पहिली घटना नाही. यापूर्वी २६ फेब्रुवारीला म्हैसूर चेन्नई वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाली होती. ही घटना कृष्णराजपुरम आणि बेंगळुरू कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकादरम्यान घडली. आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली. याशिवाय केरळमध्ये वंदे भारत एक्सप्रेसवरही दगडफेक करण्यात आली. यापूर्वी वंदे भारत एक्स्प्रेसच्या ई1 डब्यावर दगडफेक करण्यात आली होती. ही ट्रेन दिल्लीहून डेहराडूनला जात होती. १८-१९ जून रोजी या ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती.
७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर ते लखनऊ या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ९ जुलैपासून या ट्रेनचे औपचारिक कामकाज सुरू झाले. ही ट्रेन सकाळी गोरखपूरहून लखनौला निघते. संध्याकाळी ७:१५ वाजता लखनौहून गोरखपूरला परतते.