Asaduddin Owaisi, Attack in Gujarat: गुजरातमध्ये ओवेसींना लक्ष्य करून वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, AIMIM चा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 01:44 PM2022-11-08T13:44:01+5:302022-11-08T13:44:59+5:30

'वंदे भारत एक्सप्रेस' ट्रेनमधून प्रवास करत असताना झाला हल्ला

Stones pelting attack on asaduddin owaisi when travelling in vande bharat train in gujarat claims AIMIM party waris pathan | Asaduddin Owaisi, Attack in Gujarat: गुजरातमध्ये ओवेसींना लक्ष्य करून वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, AIMIM चा दावा

Asaduddin Owaisi, Attack in Gujarat: गुजरातमध्ये ओवेसींना लक्ष्य करून वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, AIMIM चा दावा

googlenewsNext

Asaduddin Owaisi, Attack in Gujarat: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना लक्ष्य करत 'वंदे भारत' ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. ओवेसी यांच्या पक्षाने फोटो शेअर करत हा दावा केला आहे. अहमदाबादहून सुरतला जात असताना ओवेसी यांच्या सीटसमोरील ट्रेनच्या खिडकीवर दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. AIMIM नेते वारिस पठाण यांनी फोटो ट्विट करून ही माहिती दिली.

वारिस पठाण यांनी सोमवारी संध्याकाळी अनेक फोटो पोस्ट करत ट्विट केले, "आज संध्याकाळी जेव्हा आम्ही असदुद्दीन ओवेसी, साबिर कलीवाला आणि AIMIM ची टीम अहमदाबादहून सुरतला जाणार्‍या 'वंदे भारत एक्सप्रेस' ट्रेनमधून प्रवास करत होतो, तेव्हा काही अज्ञात लोकांनी ट्रेन पकडली. पण काही लोकांनी काचेवर दगड मारून हल्ला केला."

एका निवेदनात, पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी (PRO) सुमित ठाकूर यांनी पुष्टी केली की ट्रेनवर दगडफेक करण्यात आली, परंतु आत कोणतेही नुकसान झाले नाही. ते म्हणाले, ७ नोव्हेंबर रोजी मुंबईला जात असताना वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. अंकलेश्वर आणि भरूच स्थानकादरम्यान ही घटना घडली. E-2 कोचच्या बाहेरील काचेचे किरकोळ नुकसान झाले आहे, मागील काचेला कोणतेही नुकसान नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे, ओवेसींचा पक्ष AIMIM देखील गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक लढवत आहे. असदुद्दीन ओवेसी गुजरातमध्ये विविध ठिकाणी सभा घेऊन पक्षासाठी मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान मेरठहून दिल्लीला जात असतानाही ओवेसींच्या ताफ्यावर गोळीबार झाला होता. टोल टॅक्सवर गोळीबार केल्यानंतर एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती.

Web Title: Stones pelting attack on asaduddin owaisi when travelling in vande bharat train in gujarat claims AIMIM party waris pathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.