अभिनेते कमल हसन यांच्यावर हल्ला, सभेनंतर फेकली अंडी आणि दगड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 10:02 AM2019-05-17T10:02:54+5:302019-05-17T10:32:11+5:30
नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता. असे वक्तव्य करणारा अभिनेता कमल हसन यांना सातत्याने विरोधाचा सामना करावा लागत आहे.
चेन्नई - नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता. असे वक्तव्य करणारा अभिनेता कमल हसन यांना सातत्याने विरोधाचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी एका प्रचारसभेदरम्यान, कमल हसन यांच्यावर अंडी आणि दगड फेकण्यात आले. तामिळनाडूमधील आरावकुरिची येथे ही घटना घडली. कमल हसन हे आपले भाषण आटोपून मंचावरून उतरत असताना दोन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. मात्र आता राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. पण असा घटनांमुळे आपण घाबरणार नाही, असे कमल हसन यांनी म्हटले आहे.
कमल हसन यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरवण्यात आल्याने पोलिसांवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, कोईंबतूरमधील सुलूर येथे होत असलेल्या पोटनिवडणुकीतील प्रचारासाठी कमल हसन यांना परवानगीन देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले की, ''आता राजकारणाची पातळी खालावत चालली आहे असे मला वाटते. मात्र असा प्रकारांमुळे मी घाबरलेलो नाही. प्रत्येक धर्मात त्यांचे स्वत:चे दहशतवादी आहेत. आम्ही खूप पवित्र आहोत असा दावा कुठलाही धर्म करू शकत नाही. प्रत्येक धर्मात अतिरेकी होते हे इतिहास सांगतो.''
Kamal Haasan on stones thrown at his rally in Trichy: I feel the quality of polity is going down. I don't feel threatened. Every religion has their own terrorist, we cannot claim that we are sanctimonious. History shows that all religions have their extremists. #Chennaipic.twitter.com/R7buqXnUBU
— ANI (@ANI) May 17, 2019
तसेच नथुराम गोडसेला पहिला हिंदू दहशतवादी म्हटल्याने निर्माण झालेल्या वादाबाबतही कमल हसन यांनी प्रतिक्रिया दिली. ''मी अटकेला घाबरत नाही. मला अटक करून दाखवा. पण मला अटक केल्यास ते त्यांनाच अधिक अडचणीचे ठरणार आहे. हा इशारा नाही सल्ला आहे.''असा टोलाही कमल हसन यांनी लगावला.
Kamal Haasan on protest over his Godse remark: I am not afraid of being arrested. Let them arrest me. If they do that it will only create more problems. It is not a warning but only an advice. pic.twitter.com/hVMkP3I9mJ
— ANI (@ANI) May 17, 2019