मुस्लिम रुग्णांवर उपचार करू नका; वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या 'त्या' व्हॉट्सअ‍ॅप चॅटमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 08:40 PM2020-06-07T20:40:24+5:302020-06-07T20:42:06+5:30

व्हायरल झालेल्या चॅटच्या स्क्रीनशॉटची पोलिसांकडून दखल; एफआयआर दाखल

Stop attending to Muslim patients WhatsApp chat between Rajasthan hospital staff goes viral | मुस्लिम रुग्णांवर उपचार करू नका; वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या 'त्या' व्हॉट्सअ‍ॅप चॅटमुळे खळबळ

मुस्लिम रुग्णांवर उपचार करू नका; वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या 'त्या' व्हॉट्सअ‍ॅप चॅटमुळे खळबळ

Next

जयपूर: मुस्लिम रुग्णांवर उपचार करू नका, अशा आशयाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे स्क्रीनशॉट्स सध्या व्हायरल झाले आहेत. यानंतर राजस्थान पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चुरू जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील चॅटचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतली. द इंडियन एक्स्प्रेसनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

सरदारशहरमधील डॉ. सुनिल चौधरी यांच्या श्रीचंद्र बराडिया रोग निदान केंद्रात काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील चॅटचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले आहेत. त्यानंतर शनिवारी चौधरी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माफी मागितली. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा रुग्णालयाचा हेतू नसल्याचं चौधरींनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

'उद्यापासून मुस्लिम रुग्णांचे एक्स-रे काढणार नाही, अशी मी शपथ घेतो,' असा एक मेसेज व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये आहे. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचं नाव बराडिया राईज असं आहे. 'मुस्लिम रुग्णांवर उपचार करणंच बंद करा,' असंदेखील याच व्यक्तीनं आणखी एका मेसेजमध्ये म्हटलं आहे. 'जर हिंदू पॉझिटिव्ह असते, डॉक्टर मुस्लिम असते, तर हिंदूंना कोणीही पाहिलं नसतं. मी मुस्लिम ओपीडी पाहणार नाही. मॅडम इथे नाहीत, असं सांगून टाका,' असा मजकूर दुसऱ्या एका मेसेजमध्ये आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं सरदारशहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पन्नू यांनी सांगितलं. 'दोन दिवसांपूर्वी पोलीस कंट्रोल रुमला याबद्दलची तक्रार मिळाली. व्हायरल झालेल्या चॅटचे स्क्रीनशॉट्स एका धर्मासोबत भेदभाव करणारे आहेत. हे मेसेज लॉकडाऊनच्या काळातील आहेत. याविषयी एफआयआर दाखल करण्यात आला आहे,' असं पन्नू यांनी सांगितलं.

पेट्रोल पंपवर एक जण खोकल्यानं खळबळ; प्रकरण वाढल्यानं पोलिसांना बोलावण्याची वेळ

"येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढणार; पण..."

...अन् आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधिताचा मृतदेह खड्ड्यात फेकला; व्हिडीओ व्हायरल

रुग्णालयानं कोरोना चाचणी अहवाल येण्याआधीच मृतदेह ताब्यात दिला, 500 जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी झाला अन्...

"कोरोना संकट काळात मोदींसारखं नेतृत्त्व लाभणं हे देशाचं भाग्य"

Web Title: Stop attending to Muslim patients WhatsApp chat between Rajasthan hospital staff goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.