काश्मिरातील दहशतवाद, ईशान्येतील बंडखोरी, नक्षलवादाला आळा : अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 06:19 AM2023-02-12T06:19:21+5:302023-02-12T06:19:53+5:30
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) सारख्या संघटनेच्या विरोधात एकाच दिवसात यशस्वी मोहीम राबवली ही वाखाणण्यासारखी बाब आहे, असेही ते म्हणाले.
हैदराबाद : केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटना, ईशान्येकडील बंडखोरी आणि डाव्या नक्षलवादाला आळा घालण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी येथे सांगितले. केंद्रीय संस्थांच्या नेतृत्वाखाली देशभरातील पोलिस दलांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) सारख्या संघटनेच्या विरोधात एकाच दिवसात यशस्वी मोहीम राबवली ही वाखाणण्यासारखी बाब आहे, असेही ते म्हणाले.
येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीत भारतीय पोलिस सेवेच्या परिवीक्षाधीन ७४ व्या तुकडीच्या दीक्षान्त समारंभात ते बाेलत हाेते. (वृत्तसंस्था)
तीन प्रमुख चिंता घटल्या
आठ वर्षांपूर्वी अंतर्गत सुरक्षा स्थिती फारशी चांगली नव्हती. जम्मू आणि काश्मीर, ईशान्य भारत आणि डाव्या विचारसरणीचा नक्षलवाद ही चिंतेची तीन प्रमुख कारणे होती. राज्यघटनेतील कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. ईशान्येतील अनेक बंडखोर संघटनांशी शांतता करार झाल्यानंतर ८००० हून अधिक बंडखोरांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. सीमावाद सोडवून विकासकामांना चालना दिल्याने ईशान्य भागात शांतता प्रस्थापित झाली आहे, असे शहा म्हणाले.