वणी बसस्थानकाबाहेर रास्ता रोको
By admin | Published: October 11, 2016 12:03 AM2016-10-11T00:03:34+5:302016-10-11T00:51:12+5:30
वणी: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी वणी बसस्थानकाबाहेर रास्ता रोको करण्यात आला. घडलेल्या घटनेचा निषेध करत सदर कृत्य करणार्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. वणी -पिंपळगाव, वणी -दिंडोरी वणी -कळवण रस्त्यावरील वाहतुक अर्धा तास खोळंबली होती. सदर घटनेची सुणावणी जलद न्यायालयात करण्यात यावी अशा घोषणा ग्रामस्थांनी दिल्या उपसरपंच विलास कङ महाराष्ट्र राज्य छत्रपती युवक कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर शेलार, विलास निरगुङे, गंगा निखाडे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलीसांना निवेदन देण्यात आले विशाल देशमुख, भरत शिरसाठ,राकेश थोरात, प्रशांत कड, भास्कर पाटील, बाळासाहेब घडवजेआदी उपस्थित होते (वार्ता हर)(10वणी01 बंद)