पोटनिवडणुकीतील ‘फिक्सिंग’वरून वादळ

By Admin | Published: December 31, 2015 12:41 AM2015-12-31T00:41:28+5:302015-12-31T00:41:28+5:30

छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांचा जावई, काँग्रेस नेते अजित जोगी आणि त्यांचे पुत्र अमित जोगी यांच्यादरम्यान टेलिफोनवर झालेल्या संभाषणाची आॅडियो टेप बाहेर आल्यामुळे

Storm from 'fixing' byelection | पोटनिवडणुकीतील ‘फिक्सिंग’वरून वादळ

पोटनिवडणुकीतील ‘फिक्सिंग’वरून वादळ

googlenewsNext

रायपूर/नवी दिल्ली : छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांचा जावई, काँग्रेस नेते अजित जोगी आणि त्यांचे पुत्र अमित जोगी यांच्यादरम्यान टेलिफोनवर झालेल्या संभाषणाची आॅडियो टेप बाहेर आल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीतील ‘फिक्सिंग’मध्ये या तिघांचाही समावेश असल्याचे या टेपवरून स्पष्ट होते.
छत्तीसगडच्या अंतागड (अनुसूचित जमाती) मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मंतुराम पवार यांनी अगदी शेवटच्या क्षणाला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर पवार यांना काँग्रेसमधून बडतर्फ करण्यात आले होते. पवार हे त्यावेळी अजित जोगींचे विश्वासू मानले जात असत.
पवार यांनी माघार घेण्यामागे पैशाचा व्यवहार झाल्याचे या आॅडियो टेपवरून उघड होते. त्यात अमित जोगी, रमणसिंग यांचा जावई पुनित गुप्ता, मंतुराम पवार आणि अजित जोगींचे माजी सहकारी फिरोज सिद्दीकी व अमिन मेमन यांच्यात झालेले संभाषण आहे.
ही टेप जाहीर झाल्यानंतर राजकीय वादळ उठले आणि काँग्रेसने रमणसिंग यांना बडतर्फ करण्याची मागणी करीत या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. त्याचबरोबर अमित जोगी यांना कारणे दाखवा नोटीस जारी करून सात दिवसांच्या आत उत्तर मागितले. तर भाजपाने हे सर्व आरोप फेटाळून लावत हा प्रदेश काँग्रेसमधील ‘अंतर्गत लाथाळ्या’चा परिणाम असल्याचे स्पष्ट केले.
रमणसिंग यांनीही आपल्यावर लावलेले सर्व आरोप निराधार असल्याचे आणि आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना या प्रकरणात ओढण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. अजित जोगी यांनीही सर्व आरोप खोटे आहेत, असे स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Storm from 'fixing' byelection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.