एका मॅचबॉक्समुळं झालं होतं NDA मध्ये सिलेक्शन! वाचा, बिपिन रावत यांच्या जीवनातील 'तो' खास किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 11:05 AM2021-12-09T11:05:21+5:302021-12-09T11:11:12+5:30
काही वर्षांपूर्वी, प्रदीर्घ काळ देशाची सेवा करणाऱ्या बिपिन रावत यांनी भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. यावेळी त्यांनी एनडीएची तयारी करतानाचा व्यैयक्तीक अनुभवही शेअर केला होता.
चेन्नई - तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीचे पार्थिव गुरुवारी दिल्लीत आणण्यात येणार असून शुक्रवारी त्यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मूळचे उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथील असलेल्या बिपिन रावत यांनी लहानपणीच भारतीय लष्करात जाण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. काही वर्षांपूर्वी, प्रदीर्घ काळ देशाची सेवा करणाऱ्या बिपिन रावत यांनी भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. यावेळी त्यांनी एनडीएची तयारी करतानाचा व्यैयक्तीक अनुभवही शेअर केला होता. (Story about CDS general bipin rawat's NDA selection.)
बिपिन रावत तेव्हा म्हणाले होते, “यूपीएससीची एनडीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, मला सर्व्हीस सिलेक्शन बोर्डाकडे जायचे होते. यासाठी मी अलाहाबादला (आता प्रयागराज) गेलो होतो. तेथील 4 ते 5 दिवसांची कठोर ट्रेनिंग आणि टेस्टनंतर आमची अंतिम मुलाखत झाली. सर्व उमेदवार एका खोलीबाहेर रांगेत उभे होते. प्रत्येकाला एक एक करून आत बोलावून प्रश्न विचारण्यात आले. हीच ते काही मिनिटे होती, जी आम्हाला एनडीएमध्ये एंट्री देऊ शकत होते अथवा बाहेरचा रस्ता दाखवू शकत होते.”
पुढे रावत म्हणाले, अखेर माझा क्रमांक आलाच. मी आत गेलो. समोर एक ब्रिगेडियर रॅंकचे अधिकारी होते. जे माझी मुलाखत घेणार होते. मी तुमच्या सारखाच एक तरुण विद्यार्थी होतो आणि ऑफिसात घेल्यानंतर थोडा थक्क झालो होतो. त्यांनी सुरुवातीला मला चार-पाच सोपे प्रश्न विचारले. मग मी थोडा रिलॅक्स झालो. यानंतर त्यांनी माझा छंद विचारला. मी त्यांना सांगितले की मला ट्रेकिंगची खूप आवड आहे.
माझे उत्तर ऐकल्यानंतर अधिकार्यांनी मला विचारले की, जर तुम्हाला चार-पाच दिवसांच्या ट्रॅकिंगसाठी जायचे असेल, तर अशी एक कोणती गोष्ठ असेल, जी तुम्ही सोबत ठेवाल. यावर उत्तर देताना बिपिन रावत म्हणाले होते, अशा स्थितीत मी एक माचिसची डबी (मॅचबॉक्स) माझ्यासोबत ठेवेन. यानंतर अशा स्थितीत आपण माचीसची डबीच का निवडली असेही त्यांना विचारण्यात आले होते.
यावर उत्तर देताना रावत म्हणाले होते, माझ्याकडे एक माचिसची डबी असेल, तर या एका गोष्टीने मी ट्रेकिंगदरम्यान अनेक कामे करू शकतो. ते पुढे म्हणाले होते, जेव्हा मनुष्य तरुण असतो तेव्हा पुढे जाण्यासाठी स्वतःला शोधणे आवश्यक असते. यामुळे माझ्या लक्षात आले, की माचिस हा माझ्या ट्रॅकिंग गियरचा सर्वात महत्त्वाचा भाग असू शकतो.