मंदीचा फटका; देशातल्या 'या' राज्यातील खाण आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 11:24 AM2019-08-06T11:24:15+5:302019-08-06T11:24:24+5:30
उत्तराखंडमध्ये कृषी, औद्योगिक आणि खाण क्षेत्रात मोठी घसरण आली असून, आर्थिक विकास दरही घटला आहे.
डेहराडूनः उत्तराखंडमध्ये कृषी, औद्योगिक आणि खाण क्षेत्रात मोठी घसरण आली असून, आर्थिक विकास दरही घटला आहे. राष्ट्रीय परिस्थितीच्या तुलनेत राज्याची परिस्थिती काहीशी दिलासादायक आहे. अर्थ संख्या संचालनालय एक रिपोर्ट जारी केला आहे, ज्यात राज्यातील प्रतिव्यक्तीच्या उत्पन्नात 16 हजारांहून अधिकची वाढ झाली आहे. परंतु आर्थिक विकास दर गेल्या वर्षीच्या तुलनेत पडला आहे. वर्षं 2016-17मध्ये आर्थिक विकास दर 10 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सद्यस्थिती हाच विकास दर 6.87 टक्के आहे.
आर्थिक विकास दर घसरण्याच्या मागे प्राथमिक क्षेत्रातील कमी होत असलेली मागणी कारणीभूत आहे. ज्यात कृषी, खाण, निर्माण, औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, अबकारी करात गेल्या वर्षीच्या तुलनेत 24.60 टक्के कमी आली आहे. जिल्ह्यातली प्रति व्यक्तीच्या उत्पन्नातील अचूक आकडा सांगितलेला नाही. डोंगराळ भाग असलेल्या डेहराडून, हरिद्वार आणि ऊधम सिंह नगरमध्ये प्रति व्यक्तीच्या उत्पन्नात सुधारणा झाली आहे.
असं केलं जातं मूल्यांकन
कोणत्याही राज्यातील उत्पन्नाचा अंदाज घेऊन त्यांच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या अंतर्गत उत्पादित होणाऱ्या एकूण वस्तू आणि सेवांचं सकल मूल्य लक्षात घेऊन हे मूल्यांकन केलं जातं. त्यासाठी आकार, आर्थिक वृद्धी दर, राज्यातील घरगुती उत्पादनाचं मूल्यांकन होतं.