दिलासादायक! अडकलेले मजूर, विद्यार्थी घरी जाऊ शकणार; गृह मंत्रालयाकडून सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 07:08 PM2020-04-29T19:08:36+5:302020-04-29T19:30:25+5:30
CoronaVirus Lockdown मजूर, प्रवासी. तिर्थयात्री, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना हा दिलासा देण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने यासाठी नियमावली बनविली असून त्याद्वारेच परराज्यातील लोकांना पाठविता किंवा आणता येणार आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटापासून देशाच्या नागरिकांना लांब ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला होता. यामुळे अनेकजण ठिकठिकाणी अडकून पडले होते. मुंबई, पुणे, दिल्ली सारख्या शहरांमध्ये रोजगारासाठी गेलेले लाखो मजूर, शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी अडकून पडले होते. आता केंद्र सरकारने या त्रासलेला लोकांना मोठा दिलासा दिला आहे.
मजूर, प्रवासी. तिर्थयात्री, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना हा दिलासा देण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने यासाठी नियमावली बनविली असून त्याद्वारेच परराज्यातील लोकांना पाठविता किंवा आणता येणार आहे. राजस्थानातील कोटामध्ये हजारो विद्यार्थी अडकले होते. महाराष्ट्रापासून अनेक राज्यांनी या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली होती.
गृहमंत्रालयाने केलेल्या नियमावलीनुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. तसेच या अडकलेल्य़ा नागरिकांना परत आणण्यासाठी एका एसओपीची तैनाती करावी लागणार आहे. यानंतर या राज्यांना एकमेकांसोबत इच्छुक लोकांसाठी चर्चा करावी लागणार आहे.
याचबरोबर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. यानंतरच या लोकांना पुढे सोडण्यात येणार आहे. या लोकांना स्थानिक प्रशासनाकडून क्वारंटाईन केले जाणार आहे. तसेच या लोकांना आरोग्य सेतू अॅप वापरासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
या अडकलेल्या नागरिकांची ने-आण करण्यासाठी बस वापरण्याची सूचना करण्यात येणार आहे. मात्र, या बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगनुसार नागरिकांना बसविण्याची अट घालण्यात आली आहे.
Ministry of Home Affairs (MHA) allows movement of migrant workers, tourists, students etc. stranded at various places. #CoronavirusLockdownpic.twitter.com/3JH2YPAuQU
— ANI (@ANI) April 29, 2020
का घेतला निर्णय?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य राज्याच्या नेत्यांनी केंद्र सरकारकडे मजूर, कामगारांना त्यांच्या त्यांच्या राज्यात जाऊ देण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. तसेच मजूर, प्रवासी, विद्यार्थ्यांकडूनही मागणी करण्यात येत होती. पंतप्रधान मोदी यांनी राज्य सरकारांना लॉकडाऊन वाढविण्याबाबत त्यांच्या पातळीवर निर्णय घेण्यास सांगितले होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
11 वर्षांनी पुन्हा येणार, २०७९ वर्ष धोक्याचे; पृथ्वीच्या जवळून गेले मोठे संकट
CoronaVirus चीनने १८४ देशांना नरक बनविले; डोनाल्ड ट्रम्प भडकले
फोर्ड संकटात! तब्बल दोन अब्ज डॉलरचा तोटा; नुकसान पाच अब्जांवर जाण्याची भीती
CoronaVirus पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने घेतली मोठी 'रिस्क'; 1000 रुपयांत कोरोना लस आणणार
देशासाठी काहीपण! आजारी बालकासाठी रेल्वेने १५०० किमींचे अंतर कापत १ लीटर दूध पोहोचवले