Strange Disease: निसर्गाचा अजबच खेळ! मूल होत नव्हतं म्हणून चेक करायला गेला, तर  समोर आली धक्कादायक बाब अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 04:02 PM2023-02-26T16:02:45+5:302023-02-26T16:04:32+5:30

यासंदर्भात बोलताना, त्याने सांगितले की, तो सध्या 30 वर्षांचा आहे. मात्र त्याला आतापर्यंत कुठल्याही समस्येचा सामना करावा लागलेला नाही. त्याचे वैवाहिक जीवन अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. केवळ मूल होत नव्हते, म्हणून तो नाराज होता. 

Strange Disease persistent mullerian duct syndrome to Man uterus in male body | Strange Disease: निसर्गाचा अजबच खेळ! मूल होत नव्हतं म्हणून चेक करायला गेला, तर  समोर आली धक्कादायक बाब अन्...

Strange Disease: निसर्गाचा अजबच खेळ! मूल होत नव्हतं म्हणून चेक करायला गेला, तर  समोर आली धक्कादायक बाब अन्...

googlenewsNext


कधी-कधी निसर्ग असा खेळ खेळतो, की सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसतो. सर्वच जण आश्चर्यचकित होतात. असाच काहीसा प्रकार हरियाणातील फरिदाबादमधून समोर आला आहे. एका तरुणाचे गेल्या 5 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण त्याला मूल होत नव्हते. यामुळे तो तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेला. तेथे जो प्रकार समोर आला, तो ऐकून अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याच्या शरिरात ओव्हरी, युट्रस आणि फॅलोपियन ट्यूब सारखे महिलांचे अवयव आढळून आले.

यासंदर्भात बोलताना, त्याने सांगितले की, तो सध्या 30 वर्षांचा आहे. मात्र त्याला आतापर्यंत कुठल्याही समस्येचा सामना करावा लागलेला नाही. त्याचे वैवाहिक जीवन अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. केवळ मूल होत नव्हते, म्हणून तो नाराज होता. 

पुरुषाच्या शरिरात आढळले फिमेल ऑर्गन्स -
माध्यमांतील वृत्तांनुसार, डॉक्टर्सनी अशी घटना क्वचितच घडते असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी, जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांच्या शरिरात मेल आणि फिमेल, असे दोन्ही प्रकारचे अंग विकसित होतात. याला सेंकडरी सेक्सुअल कॅरेक्टर म्हटले जाते, असेही सांगितले. हे अनावश्यक अवयव शरिरापासून वेगळेही केले जाऊ शकतात. संबंधित तरुणाच्या शरिरातून रोबोटिक ऑपरेशनद्वारे हे अवयव हटवण्यात आले आहेत, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे. 

आता पिता होऊ शकेल हा तरून? -
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरूण पर्सिस्टंट म्युलेरियन डक्ट सिंड्रोमने (PMDS) पीडित होता. तो सामान्यपणे पिता बनवू शकणार नाही. पण त्याची पिता होण्याची इच्छा असेल, तर तो टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमाने पिता होऊ शकतो. त्याच्या शरिरातील फीमेल ऑर्गन्स काढण्यात आले आहेत. त्याचे वैवाहिक आयुष्य अगदी उत्तम प्रकारे सुरू आहे.

Web Title: Strange Disease persistent mullerian duct syndrome to Man uterus in male body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.