विचित्र प्रेमकहाणी; सासू जावयाच्या प्रेमात झाली वेडी, सासऱ्याला झोपी घालून दोघे झाले फरार...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 01:25 PM2023-01-02T13:25:31+5:302023-01-02T13:26:19+5:30

सासरा सकाळी उठला तेव्हा त्याला पत्नी आणि जावई पळून गेल्याचे समजले.

Strange Love Story; mother-in-law fell in love with son-in-law, the two ran away after father-in-law slept | विचित्र प्रेमकहाणी; सासू जावयाच्या प्रेमात झाली वेडी, सासऱ्याला झोपी घालून दोघे झाले फरार...

विचित्र प्रेमकहाणी; सासू जावयाच्या प्रेमात झाली वेडी, सासऱ्याला झोपी घालून दोघे झाले फरार...

googlenewsNext


प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला वय, नाती यांच्या सीमा दिसत नाहीत. ही म्हण खरी ठरवत राजस्थानमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात 40 वर्षीय सासू आपल्या 27 वर्षीय जावयाच्या प्रेमात पडली. विशेष म्हणजे, प्रेमात पडलेले दोघे सासऱ्याच्या हातावर तुरी देत पळूनही गेले. या अजब प्रेमाची परिसरात जोरदार चर्चा होत आहे. 

सासऱ्याला दारू पाजली अन्...
ही अनोखी प्रेम कहानी सिरोही जिल्ह्यातील अनादरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सियाकारा गावातील आहे. 30 डिसेंबरच्या रात्री जावई सासरच्या घरी आला होता. त्याच रात्री जावाई सासऱ्यासोबत बसून भरपूर दारू प्यायला आणि सासऱ्याला खूप चढवली. यानंतर सासरा गाढ झोपी गेल्यावर संधीचा फायदा घेत जावाई सासूला घेऊन पळून गेला. या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध सुरु होते. याची माहिती ना सासरच्यांना होती ना मुलीला (पत्नीला).

सासऱ्याची पोलिसांत तक्रार 
दुसऱ्या दिवशी सकाळी सासू आणि जावई घरात दिसले नाहीत. यानंतर या संपूर्ण प्रेमप्रकरणाचा खुलासा झाला. यानंतर रमेश (सासरे) यांनी जावई नारायण जोगी याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्याने पोलिसांसमोर 30 डिसेंबरच्या रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला. विशेष म्हणजे, जावाई आपल्यासोबत त्याच्या तीन वर्षांच्या लहान मुलीलाही घेऊन गेला आहे. सध्या पोलीस फरार जावयाचा आणि सासूचा शोध घेत आहेत.
 

Web Title: Strange Love Story; mother-in-law fell in love with son-in-law, the two ran away after father-in-law slept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.