'रणनितीतज्ज्ञ' प्रशांत किशोर बनले नीतिश कुमारांचे सल्लागार, मिळाला कॅबिनेट दर्जा
By admin | Published: January 22, 2016 10:16 AM2016-01-22T10:16:01+5:302016-01-22T10:53:17+5:30
निवडणुकीची 'रणनिती' ठरवण्यात माहीर असलेले प्रशांत किशोर यांची बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला.
Next
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २२ - निवडणुकीची 'रणनिती' ठरवण्यात माहीर असलेले, आधी पंतप्रधान मोदी व नंतर नीतिशकुमार यांना दणदणीत विजय मिळवून देण्यात मोठा वाटा असलेले प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत नीतिश कुमार यांच्या 'जदयू'ला विजय मिळवून देण्यात 'रणनितीतज्ज्ञ' प्रशांत किशोर यांची प्रमुख भूमिका असून त्यांच्या कामामुळे प्रभावित झालेल्या मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी प्रशांत यांना त्यांचा सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. त्याच अंतर्गत आता किशोर यांना आता कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात येणार आहे. याप्रकरणी मंत्रीमंडळ समन्वय विभागातर्फे गुरूवारी अधिसूचना जारी करण्यात आली.
बिहार निवडणुकीत लालूप्रसाद दायव - नीतिशकुमार यांच्या महाआघाडीला संपूर्ण बहुमत मिळाले आणि राज्यात पुन्हा एकदा त्यांची सत्ता स्थापन झाली. या विजयानंतर प्रशांत किशोर यांचेही सर्व स्तरांतून खूप कौतुक झाले.