स्वबळावर लढण्यासाठी पक्षाला मजबूत करा

By Admin | Published: July 3, 2016 12:32 AM2016-07-03T00:32:09+5:302016-07-03T00:45:52+5:30

औरंगाबाद : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचे असेल तर गट आणि सर्कल पातळीवर पक्ष मजबूत केला पाहिजे,

Strengthen the party to fight on your own | स्वबळावर लढण्यासाठी पक्षाला मजबूत करा

स्वबळावर लढण्यासाठी पक्षाला मजबूत करा

googlenewsNext

औरंगाबाद : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचे असेल तर गट आणि सर्कल पातळीवर पक्ष मजबूत केला पाहिजे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.
औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूकपूर्व तयारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार, आ. सुभाष झांबड, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार नितीन पाटील, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष केशवराव औताडे, पक्षाचे निरीक्षक नतीकोद्दीन खतीब, पक्षाचे सरचिटणीस किशोर बोरकर आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील पक्षाच्या सदस्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अनेक सदस्यांनी आगामी निवडणुकीत कोणाबरोबरही आघाडी नको, स्वबळावरच निवडणुका लढवाण्यात, अशी भूमिका मांडली. त्याचा उल्लेख करून खा. चव्हाण म्हणाले की, स्वबळावर लढायचे असेल तर खाली पक्ष मजबूत असला पाहिजे.
आम्ही मुंबईहून उमेदवार लादणार नाही, मात्र जिल्हा काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस एखाद्या उमेदवारासंबंधीची माहिती पडताळून निर्णय घेईल. जात प्रमाणपत्र वैध असणाऱ्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली जाईल. जात प्रमाणपत्र वैध नसेल तर उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. पक्ष़ातर्फे महिनाभरात जिल्हा व प्रदेशस्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अर्ज स्वीकृती होईल, असे ते म्हणाले.
कार्यकर्त्यांची हजेरी
यावेळी मेळाव्यात खा. चव्हाण यांनी कोणते जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका सदस्य अनुपस्थित आहेत, याची हजेरी घेतली.
अनुपस्थित सदस्यांना पुढची निवडणूक लढवायची नाही, असे दिसत असून, त्यांचा विचार केला जाणार नाही, असा इशारा दिला. पक्षाच्या कार्यक्रमाला सर्वांची हजेरी आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
झांबड यांचा इशारा
यावेळी आ. सुभाष झांबड यांनी कार्यकर्त्यांच्या बाबतीत परखड मत व्यक्त केले. पक्षाची स्थिती चांगली असल्याचे जे लोक सांगत आहेत ते पक्षाची फसवणूक करीत आहेत. पक्षाची स्थिती खराब नाही मात्र प्रत्यक्षात खूप काम करण्याची गरज आहे.
४सिल्लोड, फुलंब्री वगळता इतर तालुक्यात मोठे काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आ. सत्तार यांनीही कार्यकर्त्यांनी झटून काम केल्यास निश्चित यश मिळेल, असे स्पष्ट केले.
यावेळी खा. चव्हाण यांनी मराठवाड्यात चांगला पाऊस पडू दे, अशी ईश्वराजवळ प्रार्थना केली. त्यांनी सर्वांना शब-ए- कद्र तसेच रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. आ. सत्तार, आ. झांबड तसेच नामदेव पवार यांनीही सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
कौमी एकता हे आपल्या देशाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. शांतता आणि सौहार्दाच्या मार्गानेच देश चालला पाहिजे, असे मत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी पक्षातर्फे आयोजित इफ्तार कार्यक्रमात केले.
४औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे बीड बायपासवरील पटेल लॉन्सवर हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी आमदार कल्याण काळे, केशवराव औताडे, सुरेशदादा पाटील, फिरोज पटेल, शब्बीर पटेल, माजी आमदार सुरेश जेथलिया, मिलिंद पाटील आदींसह पक्षाचे कार्यकर्ते आणि मुस्लिम समुदायातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Strengthen the party to fight on your own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.