हिंसक गोरक्षकांवर होणार कठोर कारवाई, पंतप्रधान मोदींचा इशारा

By admin | Published: July 16, 2017 01:39 PM2017-07-16T13:39:22+5:302017-07-16T14:54:53+5:30

गोरक्षेच्या नावावर देशात होत असलेल्या हिंसक घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त केला आहे

Strict action will be taken against the violent Gorkhara, Prime Minister Modi's warning | हिंसक गोरक्षकांवर होणार कठोर कारवाई, पंतप्रधान मोदींचा इशारा

हिंसक गोरक्षकांवर होणार कठोर कारवाई, पंतप्रधान मोदींचा इशारा

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16- गोरक्षेच्या नावावर देशात होत असलेल्या हिंसक घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त केला आहे. देशात गोरक्षेची भावना आहे. मात्र हिंसक गोरक्षकांवर कठोर कारवाई होणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी हा इशारा दिला आहे. 
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मोदींनी गोरक्षकांसह विविध मुद्द्यांवर आपले मत स्पष्ट केले. या बैठकीनंतर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, " मोदींनी हिंसक गोरक्षकांबाबत कठोर भूमिका घेतली आहे, ते म्हणाले की, देशात गोरक्षेबाबत भावना आहे. मात्र गोरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेतली जाणार नाही. हिंसक गोरक्षकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. राज्य सरकारांनी हिंसक गोरक्षकांवर कारवाई करावी." गेल्या काही काळापासून गोरक्षकांकडून गोमांस बाळगल्याच्या संशयावरून अनेकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच त्यात अनेकांचा बळीसुद्धा गेला आहे. याआधीही मोदींनी साबरमती आश्रमाच्या शताब्दी महोत्सवात बोलताना गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही. हे महात्मा गांधींनाही मान्य नव्हते", असे म्हटले होते. 
अधिक वाचा
 
(नरभक्षकाप्रमाणे आहेत स्वयंघोषित गोरक्षक : रामदास आठवले )
गोरक्षक मोकाट! गोमांस बाळगल्याच्या संशयावरून अजून एकाची हत्या )
(गोरक्षकांची आता काश्मीरमध्येही झुंडशाही )
दरम्यान, मोदींनी या बैठकीत देशात जीएसटी यशस्वीरीत्या लागू झाल्याबद्दल सर्व पक्षांचे अभिनंदन केले. तसेच पूर्वोत्तर भारतात आलेल्या पुराबाबत पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. तसेच 9 ऑगस्ट रोजी छोडो भारत आंदोलनाच्या 75व्या वर्धापन दिनी संसदेत चर्चा व्हायला हवी, असा प्रस्तावही मोदींनी ठेवल्याचे अनंत कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.  

Web Title: Strict action will be taken against the violent Gorkhara, Prime Minister Modi's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.