Fact check : CoronaVirus: 15 जूनपासून देशात पुन्हा कडक लॉकडाऊन? केंद्राचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 11:01 AM2020-06-11T11:01:16+5:302021-01-27T14:31:38+5:30

देशात पहिल्यांदा उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे.

Strict lockdown in the country again from June 15? central PIB's says its fake message | Fact check : CoronaVirus: 15 जूनपासून देशात पुन्हा कडक लॉकडाऊन? केंद्राचा मोठा खुलासा

Fact check : CoronaVirus: 15 जूनपासून देशात पुन्हा कडक लॉकडाऊन? केंद्राचा मोठा खुलासा

Next

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जेव्हा देशात ५०० रुग्ण सापडले होते, तेव्हा लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, आता अडीज महिन्यांच्या काळात हा लॉकडाऊन जवळपास संपूर्ण उठविण्यात आला आहे. मात्र, देशातील रुग्णांचा आकडा तीन लाखांकडे वाटचाल करत असताना पुन्हा येत्या 15 जूनपासून देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे मेसेज फिरत होते.

 
यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. 15 जूनपासून देशभरात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे मेसेज सोशल मिडीयावर फिरू लागले होते. या मेसेजमध्ये केलेल्या दाव्य़ानुसार 15 जूनपासून देशभरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. तसेच गृह मंत्रालयानेही लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. रेल्वे सेवेसह विमान सेवाही बंद करण्यात येणार असल्याचे यामध्ये म्हटले होते. 


सरकारची प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) ने व्हायरल होत असलेला हा मेसेज खोटा असल्याचे म्हटले आहे. पीआयबीमे फॅक्ट चेक ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, सोशल मिडीयावर एक फोटो व्हायरल होत आहे, त्यामध्ये केलेल्या दाव्यानुसार गृह मंत्रालयाकडून ट्रेन आणि विमानांवर बंदीसह देशभरात 15 जूनपासून लॉकडाऊन करण्यात येण्याची शक्यता आहे. #PIBFactcheck हा मेसेज चुकीचा आहे. खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांपासून सावध रहा. 



देशात पहिल्यांदा उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. केंद्राच्या आकडेवारीनुसार देशात एकूण 276583 लोक कोरोना व्हायरसमुळे संक्रमित झाले आहेत. 7745 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 135205 लोक कोरोना व्हायरसपासून बरे झाले आहेत. 
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

सावध व्हा! पहिली ओसरली नाहीय, देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता

Good News: बळीराजा सुखावला; राज्यात मान्सून डेरेदाखल

उलट्या बोंबा! ५००० कोटींचा घोटाळा; छाप्यात लाखोंच्या पर्स खराब केल्याने भरपाईची मागणी

Rajyasabha Election: राजस्थानमध्ये काँग्रेस संकटात; अशोक गेहलोतांकडून आमदारांची बैठक

CoronaVirus धक्कादायक! उत्पन्नाशिवाय एक महिनाही जगू शकत नाहीत निम्मे भारतीय; सीव्होटरचा सर्व्हे

भित्रा पाकिस्तान! अफवा पसरली, 'अज्ञात विमाने हवेत उडाली'; अख्ख्या कराचीची वीज घालवली

आजचे राशीभविष्य - 11 जून 2020; वृश्चिक राशीच्या लोकांनी स्त्रियांपासून जपावे

Web Title: Strict lockdown in the country again from June 15? central PIB's says its fake message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.